मखमलाबादला ५५ हजार रुपयांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 01:10 IST2021-05-03T01:09:45+5:302021-05-03T01:10:43+5:30
मखमलाबादला परिसरातील मूर्ती बनवण्याच्या दुकानातून सायकलसह विविध वस्तू चोरी केल्याप्रकरणी दुकानात काम करणाऱ्या राजस्थान येथील कामगारावर म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मखमलाबादला ५५ हजार रुपयांची चोरी
नाशिक : मखमलाबादला परिसरातील मूर्ती बनवण्याच्या दुकानातून सायकलसह विविध वस्तू चोरी केल्याप्रकरणी दुकानात काम करणाऱ्या राजस्थान येथील कामगारावर म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विवेक रमेश सोनवणे यांनी तक्रार दाखल केली आहे. विवेक सोनवणे यांच्या दुकानात राजस्थान येथील कांतिलाल नोने कालू हा कारागीर काम करीत होता. गेल्या बुधवारी त्याने दुकानात ठेवलेली २८ हजार रुपयांची सायकल, मेटलकटर, तीन छोटे-मोठे ग्राइंडर, शूज असा ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.