बाजारसमितीतून खाद्यतेलाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2022 01:31 IST2022-03-14T01:31:29+5:302022-03-14T01:31:48+5:30

दिवसेंदिवस भाजीपाला, तसेच किराणा माल महाग झाल्याने, भुरट्या चोरट्यांनी आता किराणा मालाचे दुकानाला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. एका दुकानातून चोरट्यांनी खाद्यतेल चोरी सुरू केल्याची घटना घडली.

Theft of edible oil from the market committee | बाजारसमितीतून खाद्यतेलाची चोरी

बाजारसमितीतून खाद्यतेलाची चोरी

ठळक मुद्देपेठरोड : महागाई वाढल्याने चोरट्यांचा किराणा मालावर डल्ला

पंचवटी : दिवसेंदिवस भाजीपाला, तसेच किराणा माल महाग झाल्याने, भुरट्या चोरट्यांनी आता किराणा मालाचे दुकानाला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. एका दुकानातून चोरट्यांनी खाद्यतेल चोरी सुरू केल्याची घटना घडली.

पेठ रोडवरील शरदचंद्र पवार बाजार समितीत असलेल्या किराणा दुकानाच्या बाथरूमच्या लोखंडी गज कापून दुकानात प्रवेश करून, लाखो रुपये किमतीचे खाद्यतेल डबे, तेल पिशव्या चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हिरावाडी रोड ओमनगरीत राहणाऱ्या महेश गोविंद ठक्कर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. गुरुवारी (दि. १०) रात्री ते शुक्रवारच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ठक्कर यांचे बाजार समितीतील श्रीराम ट्रेडर्स नावाच्या होलसेल किराणा दुकानाच्या बाथरूमच्या गज कापल्या. दुकानात प्रवेश करून खाद्य तेलाचे डबे, पिशवीतील पॅकिंग तेल बॉक्स असे जवळपास १ लाख ७ हजार रुपयांचे खाद्यतेल चोरी केले आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Theft of edible oil from the market committee