नामपूर रस्त्यावरून मोटारसायकलची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 01:10 IST2021-09-18T01:07:51+5:302021-09-18T01:10:24+5:30

नामपूर रस्त्यावरील एका हॉटेलसमोर उभी केलेली मोटारसायकलची चोरी झाल्याची फिर्याद दाखल झाल्याने जायखेडा पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Theft of motorcycle from Nampur road | नामपूर रस्त्यावरून मोटारसायकलची चोरी

नामपूर रस्त्यावरून मोटारसायकलची चोरी

जायखेडा : नामपूर रस्त्यावरील एका हॉटेलसमोर उभी केलेली मोटारसायकलची चोरी झाल्याची फिर्याद दाखल झाल्याने जायखेडा पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी (दि.१६) नामपूर रोडवरील हॉटेल प्रफुल्लसमोर अनिल मुरलीधर अहिरे (रा. फोफिर) यांनी उभी केलेली स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. एमएच ४१ एवाय ४२४३) सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गुंजाळ करीत आहेत.

Web Title: Theft of motorcycle from Nampur road