माणी आरोग्य केंद्रातील जलपरीची पुन्हा चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 00:21 IST2021-05-23T20:44:21+5:302021-05-24T00:21:57+5:30
सुरगाणा : तालुक्यातील माणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाणी पुरवठा करणारी बोअरवेल मोटरीची दुसऱ्यांदा चोरी झाल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे रूग्णांना पाण्यापासून वंचित करणाऱ्या त्या अज्ञात चोरट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.

माणी आरोग्य केंद्रातील जलपरीची पुन्हा चोरी
ठळक मुद्देपाणी व्यवस्थापन अडचणीत आणले
सुरगाणा : तालुक्यातील माणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाणी पुरवठा करणारी बोअरवेल मोटरीची दुसऱ्यांदा चोरी झाल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे रूग्णांना पाण्यापासून वंचित करणाऱ्या त्या अज्ञात चोरट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
सर्व सुरळीत सुरु असताना या विहिरीतील जलपरी गेल्या वर्षी मे महिन्यात चोरट्याने लांबविली होती. त्यामुळे येथील पाणी व्यवस्थापन अडचणीत आणले होते. तदनंतर पुन्हा वैयक्तिक खर्च करून दुसरी मोटर विहिरीत सोडून पाणी समस्या दूर करण्यात आली. मात्र चोरट्याने १८ मे रोजी वायरसह विहिरीतून जलपरी लंपास केली.