मालेगावी यंत्रमाग कारखान्यात चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 00:29 IST2020-12-17T20:36:33+5:302020-12-18T00:29:46+5:30

मालेगाव : शहरातील सर्व्हे नं. १०४/५ प्लॉट नं. ९४ मध्ये असलेल्या यंत्रमाग कारखान्यात गेल्या शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास चोरी झाली असून, अज्ञात चोरट्याने ९० हजार २०० रुपयांचा माल चोरून नेला. पवारवाडी पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Theft at Malegaon loom factory | मालेगावी यंत्रमाग कारखान्यात चोरी

मालेगावी यंत्रमाग कारखान्यात चोरी

हमीद हुसेन इम्तियाज अहमद (३६) रा. नवीवस्ती यांनी फिर्याद दिली. ११ डिसेंबरच्या रात्री साडेअकरा ते १२ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद यंत्रमाग कारखान्याचा कडीकोयंडा कापून आत प्रवेश केला. यंत्रमाग कारखान्यातील प्रत्येकी ८ हजार २०० रुपयाप्रमाणे ११ कॉईनचे थैले चोरून नेले. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पी. आर. काळे करीत आहेत.
मालेगावी कुबा मशिदीजवळून दुचाकी चोरी
मालेगाव : शहरातील बतुल पार्क कुबा मशिदीसमोरून ८ डिसेंबर रोजी रात्री ११ ते ९ डिसेंबरच्या सकाळी ७ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी २५ हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची दुचाकी क्रमांक एमएच ४१ झेड ८०१४ चोरून नेली. शेख एकबाल मोहंमद हुसेन यांनी आयेशानगर पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.

Web Title: Theft at Malegaon loom factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.