हिरावाडीत चेंबरवरील झाकणाची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 01:01 IST2019-09-28T01:01:32+5:302019-09-28T01:01:51+5:30
हिरावाडीतील जॉगिंग ट्रॅक दरम्यान महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या चेंबरवरील झाकणे चोरी जाण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पंचवटी महापालिका प्रशासनाने चेंबरवर झाकणे टाकलेली होती, मात्र भुरट्या चोरट्यांनी सदरची झाकणे चोरून नेल्याने चेंबर उघडे पडले आहे.

हिरावाडीत चेंबरवरील झाकणाची चोरी
पंचवटी : हिरावाडीतील जॉगिंग ट्रॅक दरम्यान महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या चेंबरवरील झाकणे चोरी जाण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पंचवटी महापालिका प्रशासनाने चेंबरवर झाकणे टाकलेली होती, मात्र भुरट्या चोरट्यांनी सदरची झाकणे चोरून नेल्याने चेंबर उघडे पडले आहे.
गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोरट्यांनी पालिकेच्या मालमत्तेवर नजर ठेवल्याने कधी लोखंडी जाळ्या चोरी जाणे तर कधी चेंबरवरील झाकणे चोरणे असे प्रकार वारंवार घडत असल्याने पालिकेचे नुकसान होत आहे. हिरावाडीतील जॉगिंग ट्रॅकला लागून अनेक चेंबर्स आहे या चेंबर्सवर काही दिवसांपूर्वी संरक्षित झाकण टाकण्यात आले होते, मात्र भुरट्या चोरांनी बहुतांशी चेंबरवरील सिमेंट काँक्र ीटचे चाकण चोरून नेले आहे. पाटकिनाऱ्याचा परिसर असल्याने गाजर गवत उगवलेले असून, याठिकाणी गाय आणि शेळ्या अनेकदा चरण्यासाठी फिरत येत असतात. चेंबरवर झाकण नसल्याने चेंबरमध्ये मोकाट जनावरे पडून जखमी होतात.