दुचाकीची धडक देऊन चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 00:19 IST2020-07-10T23:27:46+5:302020-07-11T00:19:48+5:30
कृषिनगर जॉगिंग ट्रॅकरोड परिसरात रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीस दुचाकीची धडक देत खाली पाडून त्यांच्या खिशातील महागडा मोबाइल चोरट्यांनी पळविल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि.९) सायंकाळी घडला.

दुचाकीची धडक देऊन चोरी
नाशिक : कृषिनगर जॉगिंग ट्रॅकरोड परिसरात रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीस दुचाकीची धडक देत खाली पाडून त्यांच्या खिशातील महागडा मोबाइल चोरट्यांनी पळविल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि.९) सायंकाळी घडला.
याप्रकरणी योगेश महादू पालवे (२८, रा. सिद्धार्थनगर, कॉलेजरोड) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते कृषिनगर जॉगिंगट्रकजवळील रस्त्याने पायी चालत असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीने त्यांना धडक देऊन खाली पाडले. त्यानंतर त्यांच्या पॅण्टच्या खिशातील मोबाइल बळजबरीने काढून घेत पोबारा केला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक एस. व्ही. शेंडकर करत आहेत.
खिडकीतून मोबाइलची चोरी
नाशिक : खिडीकीतून रॉडच्या सहाय्याने बेडवरील २७ हजार रुपयांचा मोबाइल चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार मटालेनगर, खुटवडनगर येथे घडला आहे. याप्रकरणी भारती नितीन कुलकर्णी (५०, रा. न्यू मटालेनगर, खुटवडनगर) यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार २७ जूनच्या रात्री त्यांच्या बंगल्याच्या मागील खिडीकतून चोरट्याने रॉडच्या सहाय्याने त्यांचा बेडवरील २७ हजार रुपयांचा मोबाइल लंपास केला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गायकवाड करत आहेत.