मुलींच्या शासकीय वसतिगृहात चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 00:24 IST2020-09-12T23:35:58+5:302020-09-13T00:24:21+5:30
नाशिक : मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीतील नासर्डीनदीच्या पुलालगत असलेल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास प्रवेश करून विद्यार्थिनींच्या पेट्या उचकटून विविध साहित्य लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मुलींच्या शासकीय वसतिगृहात चोरी
नाशिक : मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीतील नासर्डीनदीच्या पुलालगत असलेल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास प्रवेश करून विद्यार्थिनींच्या पेट्या उचकटून विविध साहित्य लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसतिगृह बंद असल्यामुळे सर्व विद्यार्थिनी आपापल्या गावी गेल्या आहेत, याचाच फायदा घेत चोरट्याने वसतिगृहात प्रवेश करत त्यांच्या पेट्या उचकावून त्यामधील काही मौल्यवान साहित्य लंपास केल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. जोपर्यंत मुली येत नाही, तोपर्यंत नेमक्या कोणत्या मौल्यवान वस्तू चोरीस गेल्या व किती रकमेचा ऐवज लंपास झाला, याबाबत उलगडा होणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले.