जिल्हा परिषदेच्या शाळेतून सिलेंडरची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 14:55 IST2020-02-05T14:55:05+5:302020-02-05T14:55:18+5:30

वणी : दिंडोरी तालुक्यातील पांडाणे येथील जिल्हा परिषद शाळेच्या किचन शेडमधुन २३०० रु पये किमतीचे दोन गॅस सिलेंडर चोरीस गेले आहेत.

 Theft of a cylinder from a Zilla Parishad school | जिल्हा परिषदेच्या शाळेतून सिलेंडरची चोरी

जिल्हा परिषदेच्या शाळेतून सिलेंडरची चोरी

वणी : दिंडोरी तालुक्यातील पांडाणे येथील जिल्हा परिषद शाळेच्या किचन शेडमधुन २३०० रु पये किमतीचे दोन गॅस सिलेंडर चोरीस गेले आहेत. पांडाणे येथे जिल्हा परिषदेची शाळा असुन तेथे असलेल्या किचनशेडमधे एक भरलेले व एक रिकामे असे दोन गॅस सिलेंडर होते. चोरट्याने सदरचे सिलेंडर लांबविल्याची तक्र ार प्रभारी मुख्याध्यापक संदीप झोटिंग यांनी दिली. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, वणी येथून घरासमोर लावलेली २५ हजार रु पये किमतीची दुचाकी अज्ञाताने चोरु न नेली आहे. चन्द्रशेखर वाटपाडे, राहणार पांडाण,े यांनी एमएच १५, डीटी १४२२ या क्र मांकाची दुचाकी लावलेली असताना अज्ञाताने ती चोरून नेल्याची फिर्याद देण्यात आली. याप्रकरणी वणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांडाणे परिसरात ठराविक अंतराने चोरट्यांनी धुमाकुळ घातल्याने असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title:  Theft of a cylinder from a Zilla Parishad school

टॅग्स :Nashikनाशिक