सेंट्रल वेअर हाउसमध्ये चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:09 IST2019-03-10T00:02:34+5:302019-03-10T00:09:22+5:30

देवळालीगाव मालधक्कारोड येथील सेंट्रल वेअरहाउस कार्यालय फोडणाऱ्या चौघा संशयितांना नाशिकरोड पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून ३५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

Theft in the Central Warehouse | सेंट्रल वेअर हाउसमध्ये चोरी

सेंट्रल वेअर हाउसमध्ये चोरी

नाशिकरोड : देवळालीगाव मालधक्कारोड येथील सेंट्रल वेअरहाउस कार्यालय फोडणाऱ्या चौघा संशयितांना नाशिकरोड पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून ३५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
देवळालीगाव मालधक्कारोड येथील सेंट्रल वेअरहाउस कार्यालय गेल्या २३ जानेवारी रोजी रात्री फोडून अज्ञात चोरट्यांनी दोन कॉम्प्युटर, सीपीयू, मॉनिटर, किबोर्ड, माउस, प्रिंटर, डोंगल असा ४३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याबाबत नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर, सहायक पोलीस निरीक्षक जे. एस. शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत जयदीप गोसावी, मिलिंद पवार, किशोर खिल्लारे, मुदस्सर पठाण, महेश सावळे, कय्युम सय्यद, निखिल वाघचौरे, विशाल पाटील यांनी मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून संशयित सचिन केवट (२०, रा. गौतम छात्रालयामागे) यास सुभाषरोड रिपोर्टे कॉर्नर येथून ताब्यात घेऊन कसून चौकशी केली.

Web Title: Theft in the Central Warehouse