कसबे सुकेणे येथे शेतीपयोगी वस्तुंची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 20:15 IST2018-08-12T20:15:06+5:302018-08-12T20:15:38+5:30
कसबे सुकेणे येथील एका शेतातील विहिरीवर असलेले सात नग इटालियन नोझल व अेवन शक्ती कंपनीचे पिस्टन अशा शेतीपयोगी वस्तू आज्ञात चोरट्याने चोरून नेल्या.

कसबे सुकेणे येथे शेतीपयोगी वस्तुंची चोरी
ओझरटाऊनशिप : कसबे सुकेणे येथील एका शेतातील विहिरीवर असलेले सात नग इटालियन नोझल व अेवन शक्ती कंपनीचे पिस्टन अशा शेतीपयोगी वस्तू आज्ञात चोरट्याने चोरून नेल्या. दिनांक ९ ते ११ आँगस्ट दरम्यान संजय यादवराव जाधव राहाणार चारी नं१ गंगापूर कँनाँल कसबे सुकेणे यांच्या शेतातील विहिरीवर असलेले इटालियन कंपनीचे सात नोझल व अेवन शक्ती कंपनीचे पिस्टन पंप. किमत १५ हजार ८०० रूपये आज्ञात चोरट्याने चोरून नेले असल्याची तक्र ार जाधव यांनी ओझर पोलिस ठाण्यात रविवारी नोंदविल्यावरून पोलिसांनी आज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे . अधिक तपास ओझर पोलिस करीत आहेत.