दुकानातून अडीच लाख रुपयांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 00:49 IST2018-07-15T00:48:51+5:302018-07-15T00:49:07+5:30

नाशिक : रेडिमेड कपड्यांच्या दुकानातून चोरट्यांनी दोन लाख ७० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना सातपूरच्या शिवाजीनगर परिसरात घडली आहे़

Theft of 2.5 lakh rupees from the shop | दुकानातून अडीच लाख रुपयांची चोरी

दुकानातून अडीच लाख रुपयांची चोरी

नाशिक : रेडिमेड कपड्यांच्या दुकानातून चोरट्यांनी दोन लाख ७० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना सातपूरच्या शिवाजीनगर परिसरात घडली आहे़
तुळजाभवानी मंदिरासमोरील रहिवासी सदानंद नाईकवाडे यांचे बसस्टॉपजवळ रेडिमेड कापड विक्रीचे दुकान आहे़ गुरुवारी (दि़१२) व शुक्रवारी (दि़१३) असे दोन दिवस दुकानास कुलूप असल्याची संधी साधून चोरट्यांनी दुकानाचे पाठीमागील शटर उचकटून आत प्रवेश केला़ यानंतर तिजोरीतील दोन लाख व कॅश काउंटरमधील ७० हजार असे दोन लाख ७० हजार रुपये चोरून नेले़ चोरट्यांनी दुकानातील पाच हजार रुपयांची तिजोरीही चोरून नेली.

Web Title: Theft of 2.5 lakh rupees from the shop