टोल नाक्याजवळ दीड लाखाची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 23:45 IST2020-01-21T23:44:19+5:302020-01-21T23:45:26+5:30
चांदवड : तालुक्यातील मंगरूळ टोलनाक्याजवळ उभ्या असलेल्या आयशर केबिनमधून अज्ञात चोरट्याने दीड लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

टोल नाक्याजवळ दीड लाखाची चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदवड : तालुक्यातील मंगरूळ टोलनाक्याजवळ उभ्या असलेल्या आयशर केबिनमधून अज्ञात चोरट्याने दीड लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
नवी मुंबई वाशी मार्केट येथे भाजीपाला विक्री करून परतणारे भडगाव तालुक्यातील कजगाव येथील चालक अशोक ठाणसिंग ठोके व विनोद अरविंद पाटील आयशर (क्र . एमएच १९ ००१९) उभी करून मंगरूळ टोल नाक्याजवळील हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले होते. यावेळी भाजीपाला विक्री केलेली रक्कम रुपये एक लाख ५२ हजार ५६१ त्यांनी पिशवीत ठेवलेली होती. जेवण करून परत आल्यानंतर सदरची पिशवी लंपास झाल्याचे लक्षात आले. त्यांनी हॉटेलमालकाकडे सीसीटीव्हीत तपासणी केली असता चोरट्याने त्यांच्या केबिनमध्ये मागील खिडकीचे कुलूप तोडून क्लिनर बाजूचा दरवाजा उघडून रोकड असलेली पिशवी चोरून नेली.
आयशरचालक अशोक ठोके यांनी चांदवड पोलिसात
तक्रार दिल्याने पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.वीजपंपाची चोरीसिन्नर : तालुक्यातील वडझिरे शिवारातील शेतकऱ्याचा १० हजार रुपये किमतीचा वीजपंप चोरून नेल्याची घटना घडली. अंकुश छबू गिते यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. केएसबी कंपनीचा तीन हॉर्सपॉवरचा सुमारे १० हजार रुपये किमतीचा वीजपंप चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार त्यांनी दिली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.