नाशिक शहरात विविध संस्थेच्या वतीने रंगभूमी दिन उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 18:27 IST2020-11-05T18:26:48+5:302020-11-05T18:27:17+5:30

नाशिक महापालिका आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने महाकवी कालिदास कला मंदिरात नटराज आणि रंगमंच पूजन करण्यात आले.

Theater Day is celebrated in Nashik city on behalf of various organizations | नाशिक शहरात विविध संस्थेच्या वतीने रंगभूमी दिन उत्साहात साजरा

नाशिक शहरात विविध संस्थेच्या वतीने रंगभूमी दिन उत्साहात साजरा

नाशिक-  मराठी रंगभूमी दिनाच्या पूर्व संध्येला म्हणजे काल राज्य शासनाने नाट्य गृह खुली करण्याचा निर्णय घेतल्याने आज नाशिक शहरात विविध संस्थेच्या वतीने रंगभूमी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने कुसुमाग्रज स्मारकात आयोजित कार्यक्रमात अभिनेते सदानंद जोशी आणि हेमा जोशी यांच्या हस्ते  रंगमंच आणि नटराज पूजन करण्यात आले त्यानंतर नाटकांचे अंश सादर करण्यात आले.  तर नाशिक शहरातील सर्वात जुन्या सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं परशुराम सायखेडकर नाट्यगृहात नटराज पूजन करण्यात आले. नाशिक महापालिका आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने महाकवी कालिदास कला मंदिरात नटराज आणि रंगमंच पूजन करण्यात आले.

Web Title: Theater Day is celebrated in Nashik city on behalf of various organizations

टॅग्स :Nashikनाशिक