शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

मोहदरी घाटात बर्निग बसचा थरार, कोल्हापूरला जाणारी लक्झरी जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 11:18 PM

एमआयडीसी व सिन्नर नगरपरिषद अग्निशमन बंबांनी घटनास्थळी पोहचून आग विझविली, सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही

सिन्नर (नाशिक)-: नाशिकहून कोल्हापुरकडे निघालेली खासगी प्रवासी बस मोहदरी घाटात तांत्रिक बिघाडामुळे पेटल्याची घटना रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. चालकाने प्रसंगावधान राखत बस उभी करुन प्रवाशांना बसमधून उतरविल्याने मोठी जीवीत हानी टळली. तथापि, बस पूर्णपणे जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले.

एमआयडीसी व सिन्नर नगरपरिषद अग्निशमन बंबांनी घटनास्थळी पोहचून आग विझविली. श्रीहरी दत्तात्रय कुलकर्णी, रा. म्हसरुळ, नाशिक हे खासगी लक्झरी बस (क्र. एमएच 09, पी.बी. 3069) नाशिकहून कोल्हापुरकडे भाविकांना घेऊन जात होते. बसमध्ये अंदाजे 30 ते 35 प्रवाशी होते. नाशिकहून निघालेली बस रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास मोहदरी घाटात आली असता, बसला आग लागल्याचे चालक कुलकर्णी यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ बस रस्त्याच्या कडेला उभी करुन प्रवाशांना बसमधून उतरण्यास सांगितले. प्रवाशी बसमधून सुखरुप बाहेर आल्यानंतर कुलकर्णी यांनी  सिन्नर नगरपरिषद व एमआयडीसीच्या आग्नीशामक दलाला तसेच एमआयडीसी पोलिसांना माहिती दिल्यानंतर दोन्ही आग्नीशामक बंब तात्काळ घटनास्थळी पोहचले व काही वेळात आग विझविण्यात आली.  चालक कुलकर्णी यांनी प्रसंगावधान दाखविल्याने बसमधील सर्व प्रवासी सुखरुप बचावले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.

दरम्यान, उन्हाची तीव्रता वाढल्याने दुचाकी किंवा चारचाकी गाड्यांना आगी लागण्याच्या घटना तालुक्यात घडत आहेत. गेल्या महिन्यात पांढुर्ली घाटात धावत्या चारचाकीला आग लागून चालकाचा मृत्यू झाला होता. दुसर्‍याच दिवशी नांदूरशिंगोटे रस्त्यावर चारचाकीने्‌ पेट घेऊन आगीत भस्मसात झाली होती. एप्रिल महिन्याच्या शेवटी मोहदरी घाटात कार पेटण्याची तसेच सोमवारी गुरेवाडी शिवारात दुचाकीने पेट घेतल्याने देशवंडी येथील तरुणाचा मृत्यू झाला तर शुक्रवारी रात्री खासगी लक्झरी बस पेटली मात्र चालकाच्या प्रसंगावधनाने प्रवाशांचा जीव वाचला. 

वाहतूक कोंडी

नाशिक-पुणे महामार्गावर मोहदरी घाटात पावणे दहा वाजेच्या सुमारास खासगी बस पेटल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळताच पोलीस हवालदार प्रकाश उंबरकर, मिलिंद शिरसाट, चालक खिळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी मोदरी घाटात धाव घेऊन रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडी दूर करण्याचे मदत कार्य केले. रात्री अकरा वाजेच्या सुमारास वाहतूक कोंडी दूर झाली होती. 

टॅग्स :fireआगBus DriverबसचालकNashikनाशिक