बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने विद्यार्थी सेना प्रमुखाचा राजीनामा

By संजय पाठक | Updated: April 26, 2023 16:22 IST2023-04-26T16:18:01+5:302023-04-26T16:22:25+5:30

संशयित किरण फडोळ याच्याविरोधात पीडित महिलेने गंगापूर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

The police has arrested the suspect Kiran Fadol, the student army nashik district chief of the Shinde group, in the case of rape | बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने विद्यार्थी सेना प्रमुखाचा राजीनामा

बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने विद्यार्थी सेना प्रमुखाचा राजीनामा

नाशिक : शिवसेना (शिंदे गट) विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख संशयित किरण फडोळ (रा. मुंगसारा, ता. नाशिक) याला बलात्काराच्या गुन्ह्यात मंगळवारी (दि. २५) रात्री गंगापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे शिवसेनेविषयी चर्चा हेाऊ लागल्याने संबंधित जिल्हाप्रमुख किरण फडोळ याने पद आणि पक्षाचा राजीनामा दिला आहे.

संशयित किरण फडोळ याच्याविरोधात पीडित महिलेने गंगापूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. संशयित फडोळ याने त्याच्या स्पा व्यवसायासाठीच्या जागेचे थकीत भाडे देण्याच्या बहाण्याने पीडित महिलेला दि. १५ मार्च २०२१ रोजी एका ठिकाणी बोलावून घेतले. त्या ठिकाणी त्याने तिला कॉफीमधून गुंगीचे औषध दिले. पीडिता बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्याचप्रमाणे संशयित फडोळ याने पीडितेवर तिच्या पतीला सोडून देण्यासाठी दबाव आणतानाच त्याच्यासोबत राहण्यासाठीही धमकावल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित फडोळविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.

Web Title: The police has arrested the suspect Kiran Fadol, the student army nashik district chief of the Shinde group, in the case of rape