पाहुण्या महिलेची सोनसाखळी ओरबाडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2022 01:33 IST2022-05-13T01:33:23+5:302022-05-13T01:33:44+5:30

भाचीच्या लग्नाला सांगली येथून आलेल्या महिलेच्या गळ्यातून तीन तोळे वजनाची ९० हजार रुपये किमतीची सोनसाखळी दुचाकीने आलेल्या चोरट्याने ओरबाडून नेल्याची घटना सोमवारी (दि.९) रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The gold chain of the guest woman was broken | पाहुण्या महिलेची सोनसाखळी ओरबाडली

पाहुण्या महिलेची सोनसाखळी ओरबाडली

पंचवटी : भाचीच्या लग्नाला सांगली येथून आलेल्या महिलेच्या गळ्यातून तीन तोळे वजनाची ९० हजार रुपये किमतीची सोनसाखळी दुचाकीने आलेल्या चोरट्याने ओरबाडून नेल्याची घटना सोमवारी (दि.९) रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील विश्रामबाग येथे राहणाऱ्या माधवी महादेव सुतार यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

गेल्या सोमवारी सुतार दाम्पत्य सांगली येथून नाशिकला भाचीच्या लग्नाला आले होते. रात्री चारचाकी वाहनातून ते सामान उतरवत असताना दुचाकीस्वार चोरटा त्यांच्या मोटारीजवळ आला. त्याने सुतार यांच्या गळ्यातून तीन तोळे वजनाची सोनसाखळी ओरबाडून सुसाट धूम ठोकली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: The gold chain of the guest woman was broken