वडिलांसह भावाला जीवे मारण्याची धमकी देत युवतीवर नऊ महिने अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2022 01:59 IST2022-07-02T01:58:59+5:302022-07-02T01:59:25+5:30

वडील आणि भावास जीवे मारण्याची धमकी देऊन एका युवतीवर तब्बल नऊ महिने संशयित कुणाल जगताप याने वारंवार बळजबरीने बलात्कार करून घरात डांबून ठेवल्याचा प्रकार गुरुवारी (दि.३०) सकाळी उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कुणाल जगताप याला अटक केली आहे.

The girl was tortured for nine months after threatening to kill her brother along with her father | वडिलांसह भावाला जीवे मारण्याची धमकी देत युवतीवर नऊ महिने अत्याचार

वडिलांसह भावाला जीवे मारण्याची धमकी देत युवतीवर नऊ महिने अत्याचार

सिडको : वडील आणि भावास जीवे मारण्याची धमकी देऊन एका युवतीवर तब्बल नऊ महिने संशयित कुणाल जगताप याने वारंवार बळजबरीने बलात्कार करून घरात डांबून ठेवल्याचा प्रकार गुरुवारी (दि.३०) सकाळी उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कुणाल जगताप याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडकोतील पवननगर परिसरातील संशयित कुणाल जगताप याने १ ऑक्टोबर २०२१ पासून ३० जून २०२२ या नऊ महिन्यांच्या कालावधीत वारंवार पीडित युवतीचे वडील व भावाला जीवे मारून टाकण्याची धमकी देत पीडितेवर वेळोवेळी बलात्कार केल्याची घटना घडली. संशयिताने पीडित तसेच गुरुवारी (दि.३०) जून २०२२ रोजी युवतीस डांबून ठेवल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संशयित आरोपी कुणाल जगताप यास पोलिसांनी ताब्यात घेत त्यास अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हरसिंग पावरा करीत आहे.

Web Title: The girl was tortured for nine months after threatening to kill her brother along with her father