शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकचा कांदा शेतकऱ्याने वाहिला बाबा अमरनाथ चरणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 17:32 IST

नैताळेच्या कांदा उत्पादक संजय साठे यांनी पाच किलो कांदे अमरनाथपुढे ठेवून केली शेतकऱ्यांसाठी प्रार्थना..

जम्मु-काश्मीर राज्यातील प्रसिद्ध देवस्थान व पवित्र गुंफा म्हणून बाबा अमरनाथ व तेथील यात्रा उत्सव देशात व देशाबाहेर प्रसिध्द आहे. नाशिक जिल्ह्यातील नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी आपल्या स्वतःच्या शेतातील पाच किलो कांदे बाबा अमरनाथ यांच्या चरणी वाहून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली. 

नाशिकहून तब्बल सहा दिवसाच्या रेल्वे, घोड्यावरील,पायी प्रवासानंतर संजय साठे आणि त्यांच्या सोबतच्या शेतकरी भाविकांनी पाच किलो कांदा बाबा अमरनाथ (बाबा बर्फानी ) यांना अर्पण केला. तसेच, ‘कांदा पिकाला योग्य भाव मिळू दे...कांदा आयात निर्यातीचे योग्य धोरण ठरविण्यास केंद्र व राज्य सरकारला सुबुध्दी दे.....!’ अशी प्रार्थनाही यावेळी करण्यात आली. त्यानंतर कांद्याचा प्रसाद तेथे उपस्थित असलेल्या व देशसेवेसाठी रात्र दिवस पहारा करणाऱ्या सैनिकांना दिला. 

अमरनाथ यात्रा उत्सव जम्मु-काश्मीर राज्यात १ जुलै २०२३ पासून सुरू झाला आहे. भगवान शंकराची पवित्र गुंफा म्हणून मोठा नावलौकिक आहे. टप्या,टप्याने अनेक राज्यातील भाविक बाबा अमरनाथच्या दर्शनासाठी प्रवास करत आहे. या नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी श्री साठे यांनी आणलेले कांदे पवित्र गुंफेसमोर असलेल्या दानपेटीला स्पर्श करून पुजाऱ्यांनी परत दिले. तेच कांदे साठे यांनी तेथे यात्रेकरूंच्या संरक्षणासाठी असलेल्या भारतीय लष्करी जवानांसाठी एका जवानाकडे सुपूर्त केले. यावेळेस त्यांच्याबरोबर शेतकरी बाजीराव अभंग. दिलीप घायाळ. श्रीकांत मंडलिक. दिलीप निकम, पवन वाकचौरे, संतोष घायाळ, ज्ञानेश्वर देसले, गणेश जेऊघाले हेही होते.

अनेक जण देवापुढे पेढ्याचा प्रसाद ठेवतात हारगुच्छ वाहतात मी पण माझ्या शेतात रात्रंदिवस कष्ट करून पिकवलेले कांदे सर्व भारतीय शेतकऱ्यांच्या वतीने बाबा अमरनाथ गुंफेत ठेवून देशासाठी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून सीमेवर पहारा देतात अशा जवानांना ते दिले आहेत. तसेच शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळावा अशी प्रार्थनाही केली आहे.-संजय साठे, कांदा उत्पादक, नैताळे, जि. नाशिक

टॅग्स :Amarnath Yatraअमरनाथ यात्राonionकांदाNashikनाशिकFarmerशेतकरी