नियत्रंण सुटल्याने गाडी ठोकली झाडाला; अपघातात पत्नी ठार, पती व दोन मुले गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2023 15:34 IST2023-01-27T15:34:02+5:302023-01-27T15:34:37+5:30
या अपघातामध्ये गंभीर दुखापत झाल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले.

नियत्रंण सुटल्याने गाडी ठोकली झाडाला; अपघातात पत्नी ठार, पती व दोन मुले गंभीर जखमी
- अशोक बिदरी
मनमाड (नाशिक ) : मध्यरात्रीच्या सुमारास इंदूर - पुणे राष्ट्रीय महामर्गावरील कुंदलगावजवळ मालेगावहून मनमाडकडे भरधाव वेगाने येणारी कार झाडावर आदळल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये गंभीर दुखापत झाल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले.
चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची चर्चा परिसरात होत असून सर्व एकाच कुंटुबातील असल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कार अपघातात पत्नीचा मृत्यू झाला असून पती व दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. या जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.