पडीक विहिरीत अनोळखी इसमाचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 23:13 IST2022-03-07T23:13:19+5:302022-03-07T23:13:42+5:30
मनमाड : शहरानजीक नगरचौकी परिसरातील पडीक विहिरीत एका अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.

पडीक विहिरीत अनोळखी इसमाचा मृतदेह
ठळक मुद्दे मनमाड शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद
मनमाड : शहरानजीक नगरचौकी परिसरातील पडीक विहिरीत एका अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.
याप्रकरणी मनमाड शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अनोळखी इसमाचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षांचे असावे असा अंदाज आहे. रविवारी हा प्रकार निदर्शनास आला. नगरचौकी शिवारातील पडीक विहिरीजवळ दुर्गंधी येत असल्याने विहिरीत डोकावून पाहिले असता एका अनोळखी इसमाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. याप्रकरणी दीपक दरगुडे यांनी मनमाड पोलीस स्थानकात खबर दिली.