शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmednagar Lok Sabha Election Result 2024 अहमदनगरमध्ये मोठी घडामोड! निलेश लंकेची विजयी आघाडी; सुजय विखेंचा काढता पाय
2
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: २०१९ मध्ये फक्त एक, २०२४ मध्ये एकावर एक; महाराष्ट्रात काँग्रेसचं खणखणीत 'कमबॅक'
3
'नितीश कुमार NDA मध्येच राहतील', JDU नेत्याने इंडिया आघाडीसोबत जाण्याचे वृत्त फेटाळले
4
मोठी बातमी! शरद पवारांचा नितीशकुमारांना फोन; थोड्याच वेळात पत्रकार परिषदेत घोषणा करण्याची शक्यता
5
Karnataka Lok Sabha Election Result 2024 : कर्नाटकात एक्झिट पोलच्या उलटे निकाल, भाजपाच्या किती जागा आघाडीवर? वाचा सविस्तर
6
सकाळपासून शशिकांत शिंदेंच पुढे होते, लीड तोडताच उदयनराजेंच्या डोळ्यात अश्रू तरळले
7
'डकैत'मधील सनी देओलसोबतच्या किसिंग सीनवर मीनाक्षी शेषाद्रीची रिअ‍ॅक्शन, म्हणाली - "हे माझ्यासाठी थोडे..."
8
Loksabha Election 2024 Result : ४०० पारचं 'स्वप्न' स्वप्नच राहिलं! शेअर बाजार आपटला, मोठे शेअर्स तोंडघशी
9
Inspirational Story: थांबा! बाजी कधीही पलटू शकते, अशक्यही शक्य होऊ शकते; वाचा 'ही' गोष्ट!
10
PHOTOS : लाडक्या माहीची कुटुंबीयांसोबत भटकंती; पत्नी साक्षीने शेअर केली झलक!
11
Lok Sabha Election 2024 : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात युसूफचा दबदबा; TMC च्या पठाणची जोरदार 'बॅटिंग'
12
NDA काठावर येताच शरद पवार 'ॲक्शन मोड'वर; नितीश कुमारांना फोन, चंद्राबाबूंनाही संपर्क साधणार?
13
"मला आधी प्रेम शोधावं लागेल मग.."; शोएबपासून वेगळी झाल्यावर पहिल्यांदाच व्यक्त झाली सानिया
14
Lok Sabha Election Result 2024 NDA Vs INDIA Live: निकाल येण्यास सुरुवात; भाजपा, काँग्रेसचे उमेदवार विजयी
15
Lok Sabha Election Result 2024:देशभरात भाजपाची पिछेहाट, पण या ४ राज्यांमध्ये शतप्रतिशत जागांवर आघाडी 
16
Uttar Pradesh Lok Sabha Election Result 2024: काँग्रेस - सपाची 'हात'मिळवणी फळाला; भाजपाला 'राम' नाही पावला!
17
काँग्रेसच्या प्रयत्नांनंतर मोदींचा चंद्राबाबू नायडूंना फोन; नितीश कुमारांचीही प्रतिक्रिया आली
18
मोदींचे 6 मंत्री पिछाडीवर; उत्तर प्रदेशात 'सायकल' सुसाट, तर बिहारमध्ये नितीश कुमारांचा जलवा
19
West Bengal Lok Sabha Election Result 2024 : CAA चा निर्णय भाजपावरच उलटला, पश्चिम बंगालमध्ये मोठा फटका, ममतांची जादू कायम
20
NDA असो वा INDIA...'नीतीश सबके है'; नरेंद्र मोदींविरोधात खरा खेळ बिहारमध्ये होणार?

'या' ठिकाणी शिवसेनेला पुन्हा सत्ता आणण्याचे मोठे आव्हान कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 2:50 PM

शैलेश कर्पे सिन्नर - गेल्या पाच वर्षात सिन्नर पंचायत समितीत शिवसेनेचे बहुमत राहिल्याने पाच वर्षे शिवसेनेने एकमताने कारभार सांभाळला. गेल्या ...

शैलेश कर्पे

सिन्नर - गेल्या पाच वर्षात सिन्नर पंचायत समितीत शिवसेनेचे बहुमत राहिल्याने पाच वर्षे शिवसेनेने एकमताने कारभार सांभाळला. गेल्या पाच वर्षात पंचायत समितीत शिवसेनेने केलेले काम आणि आता विरोधकांचा वाढता विरोध पाहता आगामी काळात पंचायत समितीत शिवसेनेला पुन्हा सत्ता आणण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

गेल्या पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने तात्कालीन आमदार राजाभाऊ वाजे व युवा नेते उदय सांगळे यांच्या नेतृत्त्वाखाली बहुमत मिळविले होते. त्यावेळी माणिकराव कोकाटे भाजपात होते. शिवसेनेचे ८ तर भाजपचे ४ सदस्य विजयी झाले होते. त्यामुळे बहुमताच्या जोरावर शिवसेनेने पाच वर्षे सत्ता उपभोगली. या काळात शिवसेनेने सर्वच्या सर्व सदस्यांना पदाधिकारी बनविण्यात यश मिळवले. पाच वर्षाच्या काळात शिवसेनेने पाच जणांना सभापती तर तीन जणांना उपसभापती पदाची खुुर्ची दिली. यावेळी सर्वच्या सर्व आठ सदस्यांना पदाधिकारी करण्यात शिवसेनेला यश मिळाले व त्यातून त्यांचा एकोपा व पक्षनेतृत्त्वाची पकड दिसून आली.

पाच वर्षाच्या काळात शिवसेनेच्या सुमन बर्डे, भगवान पथवे, शोभा बर्के, रोहिणी कांगणे व संगीता पावसे यांना सभापतीपदाची खुर्ची मिळाली तर वेणूताई डावरे, जगन्नाथ भाबड व संग्राम कातकाडे यांना उपसभापतीपदी विराजमान होण्याची संधी मिळाली. या पाच वर्षात शिवसेनेत एकजूट दिसून आली. तर माणिकराव कोकाटे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भाजपच्या चारही सदस्यांनी राष्ट्रवादीची वाट धरून आपली एकी दाखवून दिली. शिवसेनेने जशी पाच वर्षात एकी दाखवली तशीच विरोधी चारही सदस्यांनीही एकी दाखवून कोकाटे यांनी पाठराखण केली. पंचायत समितीत आज मितीस वाजे-सांगळे गटाचे आठ तर आमदार माणिकराव कोकाटे गटाचे चार सदस्य आहेत. विशेष म्हणजे पाच वर्षात सत्ताधारी शिवसेनेचे आठही सदस्यांना सभापती किंवा उपसभापती म्हणून काम करण्याची संधी दिली.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाElectionनिवडणूकPoliticsराजकारणBJPभाजपाNashikनाशिक