आमदार गोपीचंद पडळकरांच्या सभेत बिष्णोईचा फलक! CM फडणवीसांनी घेतली गंभीर दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 07:18 IST2025-05-17T07:17:25+5:302025-05-17T07:18:14+5:30

शहरातील सिडको भागात महालक्ष्मी चौक येथे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सभेत कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा फाेटो झळकवण्यात आले हाेते. 

that plaque in mla gopichand padalkar rally and cm devendra fadnavis took serious note | आमदार गोपीचंद पडळकरांच्या सभेत बिष्णोईचा फलक! CM फडणवीसांनी घेतली गंभीर दखल

आमदार गोपीचंद पडळकरांच्या सभेत बिष्णोईचा फलक! CM फडणवीसांनी घेतली गंभीर दखल

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : शहरातील सिडको भागात महालक्ष्मी चौक येथे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सभेत कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा फाेटो झळकवण्यात आले हाेते. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्याबाबत पुण्यात वक्तव्य केले. त्यानंतर नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर आले आणि १० ते १२ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलासह त्याच्या हातात बिष्णोईचा फोटो देऊन तो झळकविण्यास भाग पाडल्याचा संशयावरून एका अज्ञात तरुणाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकल हिंदू समाज प्रणीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशनच्या वतीने आयोजित सिडको येथे बुधवारी रात्री झालेल्या सभेत हे फलक फडकावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

 

Web Title: that plaque in mla gopichand padalkar rally and cm devendra fadnavis took serious note

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.