शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पाणीप्रश्नी भामरे-चव्हाणांमध्ये श्रेयवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 23:52 IST

नाशिक : नेहमीच अवर्षणग्रस्त असलेल्या बागलाण तालुक्यासाठी हरणबारी व केळझर धरणातून सुमारे ५३ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित ठेवण्यास जलसंपदा खात्याने मान्यता दिल्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर खासदार तथा संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व आमदार दीपिका चव्हाण यांच्यात श्रेयवाद सुरू झाला असून, दोघांनीही आपल्या पाठपुराव्यामुळे पाणीप्रश्न सुटल्याचे म्हटले आहे.

ठळक मुद्देबागलाण : केळझर, हरणबारीतून ५३ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित

नाशिक : नेहमीच अवर्षणग्रस्त असलेल्या बागलाण तालुक्यासाठी हरणबारी व केळझर धरणातून सुमारे ५३ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित ठेवण्यास जलसंपदा खात्याने मान्यता दिल्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर खासदार तथा संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व आमदार दीपिका चव्हाण यांच्यात श्रेयवाद सुरू झाला असून, दोघांनीही आपल्या पाठपुराव्यामुळे पाणीप्रश्न सुटल्याचे म्हटले आहे.जलसंपदा विभागाच्या निर्णयामुळे साल्हेर वळण योजना क्रमांक एकमधून १४.३६ दशलक्ष घनफूट, साल्हेर वळण योजना क्रमांक २ मधून २१.९१ दशलक्ष घनफूट व वाघंबा वळण योजनेतून १६.७५ दशलक्ष घनफूट इतके पाणी बागलाण तालुक्याला मिळणार असून, या हरणबारी धरणातून पाणी मिळावे यासाठी जनतेने आंदोलने केली आहेत. पारनेर, निताणे, आखतवाडे, गोराणे, आनंदपूर, कोटबेल, फोफीर, खिरमाणे, रातीर, सारदे, कºहे, चौगाव, अजमेर, सौंदाणे, देवळाणे, वायगाव, भाक्षी, मुळाणे या गावांना दरवर्षी पाणी प्रश्न भेडसावित असून, त्यासाठी पाठपुरावाही झाला आहे; परंतु दखल घेतली जात नसल्याने बाजार समिती निवडणुकीत ग्रामस्थांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. संरक्षणमंत्री भामरे यांच्यामुळेच सरकारला निर्णय घ्यावा लागल्याचा तर आमदार चव्हाण यांनी प्रधान सचिवांसोबत बैठक घेतल्यामुळे पाणी प्रश्न सुटल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे. दोन्ही बाजूंनी कामाचे श्रेय घेताना आजवरच्या पत्राचा संदर्भ देत पुरावे जाहीर केले आहेत. तत्कालीन आघाडी सरकारने बागलाणसाठी योजना व्यवहार्य नसल्याचे सांगून फेटाळली होती; आमदार दीपिका चव्हाण व संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी आपापल्या पातळीवर या संदर्भात पाठपुरावा सुरू ठेवला होता. तरीही विलंब होत असल्याचे पाहून अलीकडेच वीरगाव येथे शेतकऱ्यांनी आंदोलनही छेडले होते.जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी तळवाडे भामेर एक्स्प्रेस कालवा, हरणबारी, केळझर चारी क्रमांक ८ व सटाणा शहरासाठी पाणी योजना मंजूर करण्याचा निर्णय घेतला. आता जलसंपदा खात्याने हरणबारी व केळझरमधील पाणी बागलाणसाठी राखीव ठेवण्यास अनुमती दिल्याने त्यातून श्रेयवाद सुरू झाला.