मनमाड बचाव समितीचे थाळीनाद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 00:38 IST2018-01-30T00:38:22+5:302018-01-30T00:38:50+5:30
मनमाड बचाव कृती समितीच्या वतीने अप्पर तहसील कार्यालय व नायब तहसीलदार नियुक्तीच्या प्रश्नावर थाळीनाद आंदोलन केले. महिला कार्यकर्त्या कल्पना पाराशर व अनिता इंगळे यांच्या हस्ते आंदोलनाच्या भूमिका पत्राचे विमोचन करून ते नागरिकांना वाटण्यात आले. नायब तहसीलदार पदाची मनमाडला नियुक्ती झालेली नसल्याने प्रशासनाने मनमाडकरांना वाटाण्याच्या अक्षदा लावल्याचा आरोप करत समितीने सत्याग्रही जनआंदोलन सुरू केले आहे.

मनमाड बचाव समितीचे थाळीनाद आंदोलन
मनमाड : मनमाड बचाव कृती समितीच्या वतीने अप्पर तहसील कार्यालय व नायब तहसीलदार नियुक्तीच्या प्रश्नावर थाळीनाद आंदोलन केले. महिला कार्यकर्त्या कल्पना पाराशर व अनिता इंगळे यांच्या हस्ते आंदोलनाच्या भूमिका पत्राचे विमोचन करून ते नागरिकांना वाटण्यात आले. नायब तहसीलदार पदाची मनमाडला नियुक्ती झालेली नसल्याने प्रशासनाने मनमाडकरांना वाटाण्याच्या अक्षदा लावल्याचा आरोप करत समितीने सत्याग्रही जनआंदोलन सुरू केले आहे. शासनाला आपल्या मागण्यांची आठवण करून देण्यासाठी शहरातील चौकाचौकात थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी पुंडलिक कचरे, रामदास पगारे, सुरेश वाघ, रमेश खरे, अशोक परदेशी, सुशांत केदारे, अब्दुल्ला तांबोळी, सुषमा तिवारी, शमशाद, बिस्मिल्लाबी मन्सुरी, रेखाताई येणारे, मंगल केदारे, रश्मी मोरे, बबली आहिरे, आर. बी. ढेंगळे, कृष्णा पगारे, काळूजी वानखेडे, गायकवाड व इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.