जल्लादाचे काम राहुल नार्वेकर यांना करावे लागणार -संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 11:51 IST2023-05-12T11:51:34+5:302023-05-12T11:51:54+5:30
आज सकाळी ओझर येथे शिवसेना नेते व माजी आमदार अनिल कदम यांच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांनी कदम कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली

जल्लादाचे काम राहुल नार्वेकर यांना करावे लागणार -संजय राऊत
सुदर्शन सारडा
ओझर(नाशिक): हे सरकार बेकायदेशीर असल्याचे काल सिध्द झाले.या निकालात आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहे.भरत गोगावले यांची नेमणूक बेकायदेशीर आहे यावरून सगळं काही पिक्चर क्लिअर आहे.त्यामुळे हे सरकार घटनाबाह्य आहे हे सिध्द झाल्याने निकालावरून स्पष्ट झाले आहे. घोषित झालेल्या निकालावरून सरकार जाणार असून जल्लादाचे काम विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सोपवल्याचे टीकास्त्र खासदार संजय राऊत यांनी केले.
आज सकाळी ओझर येथे शिवसेना नेते व माजी आमदार अनिल कदम यांच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांनी कदम कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. राऊत म्हणाले, न्या.धनंजय चंद्रचूड यांचे वडील देखील त्यावेळी न्यायमूर्ती असताना त्यांनी इंदिरा गांधी सरकारला देखील धक्का दिला होता. त्यामुळे केजरीवाल यांना देखील असेच दिल्लीचे नायब राज्यपाल काम करू देत नसल्याने तो निकाल दिल्लीच्या मुख्यमंत्री यांच्या बाजूने गुरुवारी लागला आहे.त्यामुळे केजरीवाल यांना काम करणे सोपे होणार आहे.आताचे राज्य सरकार हे बेकायदेशीर असून स्वतः गोगावले यांची बेकायदेशीर नेमणुक झाल्याने शिंदे हे सुध्दा नियमबाह्य मुख्यमंत्री आहे.त्यामुळे सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा आमच्या बाजूने असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्राचे दडपण जास्त दिवस चालणार नाही. जनता आमच्या बाजूने भक्कम उभी असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.
यावेळी इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, जयंत दिंडे, सुनील बागुल,विजय करंजकर, सुधाकर बडगुजर ,विलास शिंदे,डी जी सुर्यवंशी,बापू जाधव, दीपक शिरसाठ,कामेश शिंदे,प्रशांत पगार,नितीन काळे,संजय पगार यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.