कार्तिकी एकादशीनिमित्त ठाणगावी दीपोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 18:21 IST2018-11-20T18:21:10+5:302018-11-20T18:21:43+5:30

सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील स्वध्याय परिवाराच्या वतीने मारुती मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला.

Thaanggavi Deepa Festival on Kartiki Ekadashi | कार्तिकी एकादशीनिमित्त ठाणगावी दीपोत्सव

सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील मारुती मंदिर परिसरात स्वाध्याय परिवाराच्या वतीने कार्तिकी एकादशीनिनित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला, त्याप्रसंगी स्वाध्याय परिवारातील सदस्य.

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील स्वध्याय परिवाराच्या वतीने मारुती मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला.
स्वाध्याय परिवाराच्या शकुंतला भावसार यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या चार वर्षांपासून कार्तिकी एकादशीला हजारो दीप लावून साजरा केला जातो. यावर्षीही एकादशीच्या निमित्ताने हजारो दिव्यांच्या प्रकाशाने येथील मारुती मंदिर परिसर उजळून निघाला होता. येथील मारुती मंदिरात पाच वाजेपासून स्वाध्याय परिवारातील सदस्य सुनंदा आंबेकर, मीना कर्डिले, मंदा कर्डिले, चद्रंभागा व्यवहारे, विमल केदार, सुरेखा खोलमकर, छबुबाई केदार यांच्यासह मुले या दीपोत्सवात सहभागी झाली होती. या दीपोत्सवाचे महत्त्व शकुंतला भावसार यांनी उपस्थित महिलांना सांगितले. त्यानंतर मंदिरात आरती करण्यात आली.

Web Title: Thaanggavi Deepa Festival on Kartiki Ekadashi