शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याचा वावर, रामनगरमध्ये दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 00:50 IST

रामनगर : रामनगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र असल्याने, या परिसरात सातत्याने बिबट्या दिसत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देतांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे.

ठळक मुद्देपरिसरात तत्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा

रामनगर : रामनगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र असल्याने, या परिसरात सातत्याने बिबट्या दिसत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देतांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. प्रत्येक दिवशी अनेक शेतकऱ्यांना कधी उसाच्या फडात तर कधी नदीच्या काठावर, गावकुसाला, झाडांच्या आडोशाला बिबट्या नजरेस पडत असल्याने, या परिसरात तत्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.रामनगर परिसरातील गणेश टेकडी, पिंपळगारस्ता, लिंबालवण याभागात बिबट्याचे दर्शन अनेक शेतकऱ्यांना झाले आहे. रविवारी (दि.७) गणेश टेकडी परिसरातील रामदास दगडू थेटे यांच्या गट नं. २०१ मधील उसाच्या शेतामध्ये बिबट्या व मादी दोन बछडे सुरेश थेटे व देविदास कोल्हे, ज्ञानेश्वर जामकर यांना सायकाळी सात वाजण्याच्या दरम्यान दिसून आले.परिसरात बिबट्याचा वावर दिसून आल्याने, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे‌. भारनियमनमुळे रात्रीचा वीजपुरवठा सुरू असल्याने, शेतकऱ्यांना रात्री विद्युत पंप सुरू करण्यासाठी शेतात जावे लागते. अशा वेळी रात्री अपरात्री एकटा शेतकरी जीव मुठीत धरून काम करत आहे, तर अनेक शेतकरी बिबट्याच्या भीतीने पिकांना पाणी देत नाहीत, त्यामुळे पाणी असूनही पिके सुकू लागली आहे. त्यामुळे तत्काळ वनविभागाने बिबट्याला व मादीला जेरबंद करावे, अशी मागणी रामनगर परिसरातील शेतकरी व नागरिक करत आहेत.

टॅग्स :leopardबिबट्याforestजंगल