दहावी, बारावी पुरवणी परीक्षेस मराठी पेपरने प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 01:56 AM2020-11-21T01:56:00+5:302020-11-21T01:57:52+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेस प्रथम भाषा मराठीच्या पेपरने शुक्रवार (दि.२०)पासून प्रारंभ झाला

Tenth, twelfth supplementary examination started with Marathi paper | दहावी, बारावी पुरवणी परीक्षेस मराठी पेपरने प्रारंभ

दहावी, बारावी पुरवणी परीक्षेस मराठी पेपरने प्रारंभ

Next

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेस प्रथम भाषा मराठीच्या पेपरने शुक्रवार (दि.२०)पासून प्रारंभ झाला असून, जिल्ह्यातून १३ केंद्रांवर बारावीतील कला शाखेचे २ हजार २२३ विज्ञानचे ५५५, वाणिज्यचे ७११ व एमसीव्हीसीचे ३७५ असे एकूण ३ हजार ८६४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, तर १ हजार ८४२ दहावीच्या विद्यार्थ्यांनी १५ केंद्रांवर पुरवणी परीक्षा दिली.

बारावीच्या पुरवणी परीक्षा नियंत्रणासाठी १३ केंद्र संचालक व १२ परीरक्षकांची नेमणूक करण्यात आली असून, दहावीच्या परीक्षेसाठी १५ केंद्रसंचालकांसह दहा परीरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा ओळखपत्र, मास्क, पाण्याची बाटली, लेखन साहित्य परीक्षा कक्षात ज देण्यात आली होती. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रांवर सॅनिटायझर व थर्मल स्कॅनिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

Web Title: Tenth, twelfth supplementary examination started with Marathi paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.