जिल्ह्यात दहा हजार दिव्यांग मतदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 00:42 IST2019-09-28T00:42:10+5:302019-09-28T00:42:42+5:30
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून अनेक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. मतदानासाठी सुलभता येण्यासाठी सर्वच मतदान केंद्रे हे आता तळमजल्यावर आले आहेत.

जिल्ह्यात दहा हजार दिव्यांग मतदार
नाशिक : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून अनेक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. मतदानासाठी सुलभता येण्यासाठी सर्वच मतदान केंद्रे हे आता तळमजल्यावर आले आहेत. जिल्ह्यातील दहा हजार ६०० मतदारांनादेखील यामुळे सुलभता होणार असून, त्यांचा सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. दिव्यांगांमध्ये मतदानाची जनजागृती करून त्यांच्यासाठी मतदान केंद्रांवर सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा निवडणूक देखरेख समितीच्या बैठकीत त्यांनी दिव्यांग मतदारांच्या केंद्रांवरील सुविधेबाबतचा आढावा घेतला. नाशिक जिल्ह्यात १० हजार ६०० दिव्यांग मतदार आहेत. यासर्व दिव्यांगांना मतदान केंद्रावर ने -आण करण्याची व्यवस्था करावी, त्याचप्रमाणे मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी रॅम्पस, व्हीलचेअर्स, ब्रेलस्क्रिप्ट अशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. ज्यामुळे दिव्यांग मतदारांना मतदान
प्रक्रियेत सहभागी होणे सोईस्कर होईल तसेच पीडब्ल्यूडी अॅप (पर्सन विथ डिजअॅबेलिटी)विषयी प्रचार व प्रसार करावा. मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना दिव्यांग व्यक्तींसाठी सक्षम प्रवेश योग्य व अडथळामुक्त वातावरण तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.