अल्पवयात लग्न लावणाऱ्या दहा जणांना सटाण्यात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 01:39 AM2018-12-01T01:39:27+5:302018-12-01T01:39:45+5:30

दोधेश्वर येथील शिव मंदिरात अल्पवयीन मुला- मुलीचा विवाह लावणाºया दहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

 Ten people detained in the suburbs | अल्पवयात लग्न लावणाऱ्या दहा जणांना सटाण्यात अटक

अल्पवयात लग्न लावणाऱ्या दहा जणांना सटाण्यात अटक

Next

सटाणा : दोधेश्वर येथील शिव मंदिरात अल्पवयीन मुला- मुलीचा विवाह लावणाºया दहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.  अल्पवयीन मुला-मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती सटाणा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, निरीक्षक वासुदेव देसले, सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांनी सापळा रचला. अल्पवयीन वधू-वरासह त्यांचे नातलग मंदिरात पोहोचले. पुरोहिताने लग्नविधी पार पाडल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यामुळे त्या ठिकाणी असलेले सर्व नातलग व लग्न लावून देणारे नाना घोडेस्वार व चंद्रकला घोडेस्वार यांना दरदरून घाम फुटला. अल्पवयीन मुलीचा विवाह सोग्रस (ता. चांदवड) येथील मुलाशी लावून दिल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी याप्रकरणी दहा जणांना अटक केली आहे.

Web Title:  Ten people detained in the suburbs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.