लासलगाव परिससरातील दहा बाधित कोरोनामुक्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 00:17 IST2020-06-14T23:39:58+5:302020-06-15T00:17:21+5:30
आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेले लासलगाव शहर आणि कोरोनामुक्त झाला आहे. कोरोनामुक्तीसाठी शासन नियमांची काटेकोर अंमलबजावणी येथे करण्यात आली आहे.

लासलगाव येथील कोविड सेंटरमधून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना टाळ्या वाजवून निरोप देताना आरोग्य अधिकारी व कर्मचारी.
लासलगाव : आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेले लासलगाव शहर आणि कोरोनामुक्त झाला आहे. कोरोनामुक्तीसाठी शासन नियमांची काटेकोर अंमलबजावणी येथे करण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण लासलगाव जवळील पिंपळगाव नजीक येथे आढळला होता. त्याच्या संपर्कातील सात जण कोरोनाबाधित झाले होते. या सर्वांना उपचारानंतर कोरोनामुक्त केले गेले. तर निरंक झालेल्या लासलगावला आणखी धक्का बसला तो पंधरा दिवसानंतर. मुंबई येथे कांदा विक्री करणारा कोरोनाबाधित सापडल्याने मात्र, शासनाच्या मार्गदर्शनानुसार कारवाई करीत लासलगाव ग्रामपंचायतीला कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यात यश आले. त्या बाधिताचीही कोरोनामुक्ती झाली.
आतापर्यंत १० जणांची कोरोनावर मात करत घरवापसी केली आहे. प्रशासनाने बाधित रुग्ण सापडल्यानंतर परिसर कंटेन्मेंट झोन घोषित करीत सील केले. सॅनिटायझर फवारणी केली. कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील लोकांना होम क्वॉरण्टाइन करीत कोरोना चाचणी केली. त्यात अनेकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले तर बाधितांवर यशस्वी उपचार करून त्यांना पुन्हा सुखरूप घरी पाठविण्यात आले.
लासलगाव परिसरातील विविध गावात कोरोना आटोक्यात असला तरी किरकोळ खोकल्यासह कोरोनासदृश लक्षणे असली तर तातडीने उपचारासाठी आरोग्य केंद्रात यावे, असे आवाहन लासलगाव कोरोना कोविड उपचार केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाराम शेंद्रे यांनी केले आहे.