चैत्र यात्रोत्सवानिमित्त विंध्याचल स्थानकावर तात्पुरता थांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 12:52 IST2020-03-03T12:51:54+5:302020-03-03T12:52:03+5:30

मनमाड: चैत्र यात्रोत्सवासाठी विंध्याचल येथे जाणाऱ्या प्रवाशांची मोठया प्रमाणात होणारी गर्दी पाहता या स्थानकावर काही प्रवाशी रेल्वे गाड्यांना तात्पुरता थांबा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळे मनमाड जंक्शन स्थानकावरून विंध्याचल येथे जाणाºया भाविक प्रवाशांची मोठी गैसोय दूर झाली आहे.

 Temporarily stop at Vindhyachal station for Chaitra Yatra | चैत्र यात्रोत्सवानिमित्त विंध्याचल स्थानकावर तात्पुरता थांबा

चैत्र यात्रोत्सवानिमित्त विंध्याचल स्थानकावर तात्पुरता थांबा

मनमाड: चैत्र यात्रोत्सवासाठी विंध्याचल येथे जाणाऱ्या प्रवाशांची मोठया प्रमाणात होणारी गर्दी पाहता या स्थानकावर काही प्रवाशी रेल्वे गाड्यांना तात्पुरता थांबा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळे मनमाड जंक्शन स्थानकावरून विंध्याचल येथे जाणाºया भाविक प्रवाशांची मोठी गैसोय दूर झाली आहे.
विंध्याचल येथे भरणाºया चैत्र नवरात्री यात्रोत्सवासाठी नाशिकसह औरंगाबाद व नगर जिल्ह्यातील प्रवाशी भाविक मोठया संख्येने मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकावरून विंध्याचलकडे जातात.याची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाच्या वतीने दहा गाड्यांना विंध्याचल येथे २५ मार्चपासून ८ एप्रिलपर्यंत तात्पुरता थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
--------------------------------------
विंध्याचल येथे थांबा देण्यात आलेल्या गाड्या
* गाडी क्र मांक - १२३३५ अप भागलपुर ङ्क्त लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
* गाडी क्र मांक ङ्क्त१२३३६ डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस - भागलपुर एक्सप्रेस
* गाडी क्र मांक ङ्क्त १५६४६ अप गुवाहाटी - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
* गाडी क्र मांक ङ्क्त १५६४५ डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस - गुवाहाटी एक्सप्रेस
*गाडी क्र मांक ङ्क्त १५६४८ अप गुवाहाटी - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
*गाडी क्र मांक ङ्क्त १५६४७ डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस - गुवाहाटी एक्सप्रेस
* गाडी क्र मांक ङ्क्त १२१४२ अप पाटलीपुत्र - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
*गाडी क्र मांक ङ्क्त १२१४१ डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस ङ्क्त पाटलीपुत्र एक्सप्रेस
*गाडी क्र मांक ङ्क्त १२१६८ अप मंडू - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
*गाडी क्र मांक ङ्क्त १२१६७ डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस मंडू एक्सप्रेस

Web Title:  Temporarily stop at Vindhyachal station for Chaitra Yatra

टॅग्स :Nashikनाशिक