टेम्पो ट्रॅव्हलरला अचानक आग लागल्याने वाहन जळुन खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 18:53 IST2020-12-12T18:50:11+5:302020-12-12T18:53:52+5:30
इगतपुरी : मुंबई-आग्रा महामार्गावरील तळेगांव फाटा येथे टेम्पो ट्रॅव्हलरला अचानक आग लागल्याने वाहन जळुन खाक झाले. सुदैवाने चौदा प्रवाशांनी वेळीच वाहनातुन बाहेर आल्याने त्यांचे प्राण बचावले. शनिवारी सकाळच्या सुमारास इगतपुरी तळेगाव फाट्याजवळ मुंबईहुन भंडारदराकडे जाणारा प्रवासी टेम्पो ट्रॅव्हलरला शॉर्टसर्कीटमुळे अचानक पेट घेतल्याने वाहन जळुन खाक झाले, तर त्यातील चौदा प्रवासी सुखरूप बचावले.

टेम्पो ट्रॅव्हलरला अचानक आग लागल्याने वाहन जळुन खाक
इगतपुरी : मुंबई-आग्रा महामार्गावरील तळेगांव फाटा येथे टेम्पो ट्रॅव्हलरला अचानक आग लागल्याने वाहन जळुन खाक झाले. सुदैवाने चौदा प्रवाशांनी वेळीच वाहनातुन बाहेर आल्याने त्यांचे प्राण बचावले. शनिवारी सकाळच्या सुमारास इगतपुरी तळेगाव फाट्याजवळ मुंबईहुन भंडारदराकडे जाणारा प्रवासी टेम्पो ट्रॅव्हलरला शॉर्टसर्कीटमुळे अचानक पेट घेतल्याने वाहन जळुन खाक झाले, तर त्यातील चौदा प्रवासी सुखरूप बचावले.
शनिवारी( दि. १२) सकाळच्या सुमारास मुंबईहुन भरधाव वेगाने येणारा प्रवासी टेम्पो ट्रॅव्हलर (एम. एच. ४३ एच. ४७५६) ही गाडी चौदा प्रवाशांना घेवुन भंडारदरा येथे सहलीसाठी जात असतांना वाहनात शॉर्टसर्कीट झाल्याने इगतपुरी महामार्गावरील तळेगाव फाटा येथे सकाळी ७ वाजेच्या सुमारात अचानक आग लागली. घटना घडताच या गाडीतील प्रवाशांना टोल प्लाझाच्या कर्मचारींनी सुखरूप बाहेर काढल्याने कोणतीही जीवीत हानी झाली नाही, मात्र टेम्पो ट्रॅव्हलर पुर्णपणे जळुन खाक झाला, अशी माहिती वाहन चालक दादा भिकाजी हानेकर(रा. शिवडी, टिळक नगर, मुंबई) यांनी दिली.
या बाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात अकस्मात घटनेची नोंद करण्यात आली आहे. या प्रसंगी इगतपुरी नगरपरिषदेच्या अग्नीशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. तर टोल प्लाझाच्या महामार्ग सुरक्षा पथकाने प्रवाशांना वेळीच वाहनातुन बाहेर काढल्याने कोणतीही जीवीत हानी झाली नाही. यावेळी टोल प्लाझाचे रूट पेट्रोलींग अधिकारी जाहिद खान, कंट्रोलरूम अधिकारी राजु चंद्रमोरे, सुरक्षावाहक राजू उघडे, सतीश परदेशी, मुन्ना पवार, वसीम शेख आदी कर्मचारी व इगतपुरी नगरपरिषदेचे अग्नीशामक दलाचे वाहक नागेश जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवुन वेळीच मदत केल्याने मोठी दुर्घटना टळली, व सर्व प्रवाशी सुखरूप बचावले. या अपघाताचा अधिक तपास पोलीस निरिक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ईश्वर गंगावणे हे करीत आहेत.
(फोटो १२ इगतपुरी,१)
मुंबई महामार्गावर इगतपुरी येथे आग लागलेला टेम्पो ट्रॅव्हलर. आग विझवताना अग्नीशमनदलाचे कर्मचारी.