तपमानाचा पारा ३९ अंशांवर कायम वाढत्या उष्म्याने नाशिककर त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:31 IST2018-04-04T00:31:36+5:302018-04-04T00:31:36+5:30
नाशिक : एप्रिल महिना उजाडताच उन्हाची तीव्रता अधिक वाढली असून मार्च महिन्यापासून कमाल तपमानाचा पारा पस्तीशीला जाऊन पोहचला असताना अखेरच्या आठवड्यात तपमानाने पस्तीशीही ओलांडली.

तपमानाचा पारा ३९ अंशांवर कायम वाढत्या उष्म्याने नाशिककर त्रस्त
नाशिक : एप्रिल महिना उजाडताच उन्हाची तीव्रता अधिक वाढली असून मार्च महिन्यापासून कमाल तपमानाचा पारा पस्तीशीला जाऊन पोहचला असताना अखेरच्या आठवड्यात तपमानाने पस्तीशीही ओलांडली असून चालू महिन्याचे तीन दिवसांतच पारा चाळिशीजवळ पोहचल्याने नाशिककरांना उन्हाचा जबरदस्त तडाखा बसू लागला आहे. मंगळवारीही (दि.३) कमाल तपमानाचा पारा ३९.२ अंशांवर कायम राहिला. गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी एप्रिल अधिक हॉट राहणार असल्याची चिन्हे दिसत आहे, कारण गेल्या वर्षी पंधरवड्यात तपमानाचा पारा चाळिशीजवळ पोहचला होता; मात्र यंदा पहिल्याच आठवड्यात तपमान ३९ अंशांच्या पुढे गेल्याने पंधरवड्यात तपमान चाळीशीपार जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सोमवारी (दि.२) शहराचा कमाल तपमानाचा पारा ३९.२ अंशांपर्यंत पोहचला होता. मंगळवारीही पारा इतकाच टिकून राहिला. एकूणच उन्हाची तीव्रता शहरात कायम असल्यामुळे नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. पाणी अधिकाधिक पिण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. शीतपेय, अती थंड पाणी पितांना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. शक्यतो माठामधील थंड पाणी तहान भागविण्यासाठी पूरक ठरते. त्यामुळे ते पाणी पिण्यास प्राधान्य द्यावे, जेणेकरून घशाचे विकार व सर्दीसारख्या आरोग्यविषयक तक्रारी होणार नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.