शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

तपमानाचा पारा ८.५ अंशांपर्यंत घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 1:32 AM

किमान आणि कमाल तपमानात सातत्याने घसरण सुरूच असून, सोमवारी (दि.१७) किमान तपमानाचा पारा ८.५अंशांपर्यंत घसरला. या हंगामातील ही नोंद नीचांकी ठरली. एक दिवसात दोन अंशांनी तपमानात घट होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

नाशिक : किमान आणि कमाल तपमानात सातत्याने घसरण सुरूच असून, सोमवारी (दि.१७) किमान तपमानाचा पारा ८.५अंशांपर्यंत घसरला. या हंगामातील ही नोंद नीचांकी ठरली. एक दिवसात दोन अंशांनी तपमानात घट होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत ९.४ अंश इतकी या हंगामातील नीचांकी नोंद ठरली होती. मागील वर्षी डिसेंबरअखेर ७.५ अंश इतकी नीचांकी नोंद झाली होती.  आठवडाभरापासून नाशिककर वाढत्या थंडीने गारठले असून, तपमानाचा पारा सातत्याने दहा अंशांच्या जवळपास स्थिरावत होता; मात्र सोमवारी पारा थेट आठ अंशांपर्यंत खाली आल्याने नाशिककर चांगलेच गारठले. नाशिककरांना पहाटेपासून दुपारपर्यंत हुडहुडी जाणवत होती. संध्याकाळी ५ वाजेनंतर पुन्हा गारवा वाढण्यास सुरुवात होते. रात्री उशिरापर्यंत हुडहुडी नागरिकांना सहन करावी लागत आहे. मागील सहा दिवसांपासून शहराचे किमान तपमान दहा अंशांच्या आसपास स्थिरावत आहे. गेल्या मंगळवारी (दि.११) हंगामातील नीचांकी ९.४ इतक्या तपमानाची नोंद झाली होती. कमाल तपमानात मागील पाच दिवसांपासून घसरण सुरूच असून, थंडीची तीव्रता अधिकच वाढली आहे. शहरात ८.५, तर निफाड तालुक्यात पारा थेट ७.२ अंशांपर्यंत खाली घसरला. दरम्यान, उत्तर महाराष्टÑातही थंडीचा जोर वाढला आहे.आरोग्यावर परिणाम; सर्दी-पडशाचे रुग्णवाढत्या थंडीमुळे नागरिक पहाटे व रात्री शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. संध्याकाळी साडेसात वाजेनंतर शहरातील बाजारपेठांमध्येही शुकशुकाट मागील चार दिवसांपासून दिसून येत आहेत. तसेच दिवसभर उबदार कपडे परिधान करण्यास नागरिक प्राधान्य देत आहेत. वाढत्या थंडीमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे.या शहरांमध्ये थंडीचा जोरपुण्यात ८.३ , जळगावमध्ये ८.४, नाशिकमध्ये ८.५, तर अहमदनगरमध्ये ८.७ इतक्या किमान तपमानाची सोमवारी सकाळी नोंद झाली. राज्यातील ही शहरे थंडीने गारठली आहेत. महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी किमान तपमान १०.४, तर साताऱ्यात ११.४ इतके किमान तपमान नोंदविले गेले.

टॅग्स :TemperatureतापमानenvironmentवातावरणNashikनाशिक