तहसीलदारांनी शिकवला बालभारतीचा धडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 18:33 IST2019-08-01T18:32:14+5:302019-08-01T18:33:40+5:30

नांदगाव येथील तहसीलदार आबा महाजन यांनी येथील जिल्हा परिषेदेच्या मराठी शाळेस भेट देऊन चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना ‘मला शिकायचंय’ हा धडा शिकवला.

Tehsildars taught the lesson of childbirth | तहसीलदारांनी शिकवला बालभारतीचा धडा

साकोरा जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना बालभारतीचा धडा शिकवितांना नांदगावचे तहसीलदार आबा महाजन.

साकोरा : नांदगाव येथील तहसीलदार आबा महाजन यांनी येथील जिल्हा परिषेदेच्या मराठी शाळेस
भेट देऊन चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना ‘मला शिकायचंय’ हा धडा शिकवला.
महाजन बुधवारी महसुली कामकाजाबाबत साकोरा येथे भेट दिली. तलाठी यांच्या सजेस भेट दिल्यानंतर महाजन यांनी हा धडा मी स्वत: लिहिलेला आहे, असे सांगताच मुलं आणि शिक्षक आनंदली. स्वत: लेखक आपल्या भेटीला आल्याचे पाहून मुलांचे चेहरे खुलले. धड्यावर आधारित प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या मुलांना बक्षिसे व
शासनाच्या गाडीतून एक रपेट मारून आणली.

Web Title: Tehsildars taught the lesson of childbirth