युवा मल्हार सेनेचा तहसिलवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:12 IST2018-04-27T00:12:17+5:302018-04-27T00:12:17+5:30
मालेगाव : आपल्या विविध मागण्यांसाठी युवा मल्हार सेनेच्या वतीने आज गुरूवारी अपर जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसिल कार्यालयावर मोर्चा नेऊन धरणे आंदोलन करण्यात आले.

युवा मल्हार सेनेचा तहसिलवर मोर्चा
मालेगाव : आपल्या विविध मागण्यांसाठी युवा मल्हार सेनेच्या वतीने आज गुरूवारी अपर जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसिल कार्यालयावर मोर्चा नेऊन धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मल्हार सेना तालुका प्रमुख रोहित सरोदे, जिल्हा कार्याध्यक्ष सागर दुकळे, तालुका महासंघटक भुषण खैरनार यांच्याहस्ते प्रांताधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. धनगर समाजाला अनुजमाती आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अहिल्यादेवी शेळी-मेंडी महामंडळाला एक कोटींची तरतुद करावी, मेंढपाळ व्यवसायांसाठी जंगले राखीव करावीत, आदि मागण्यांचा समावेश निवेदनात होता. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.