कौतिकपाडेतील तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 20:08 IST2018-08-06T20:08:15+5:302018-08-06T20:08:53+5:30

कौतिकपाडेतील तरुणाची आत्महत्या
सटाणा : वडील बाहेरगावी नातेवाईकाच्या अंत्यविधीला गेलेले आणि आई शेतात काम करत असतांना २२ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बागलाण तालुक्यातील कौतिकपाडे येथे रविवारी दुपारी उघडकीस आली .
सटाणा महाविद्यालयात प्रथम वर्ष कला शाखेत शिक्षण घेणाऱ्या भोला गोकुळ पवार (२२) या महाविद्यालयीन युवकाने आत्महत्या केल्याचे कारण स्पष्ट झालेले नाही. सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. कौतिकपाडे येथील शेतकरी गोकुळ सरदारसिंग पवार आपल्याच नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी गेलेले असताना त्यांच्या एकुलत्या मुलाने गळफास घेवून आत्महत्या केली .