किकवारी येथे युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 01:04 IST2018-03-21T01:04:11+5:302018-03-21T01:04:11+5:30

नाशिक : विषारी औषध सेवन करून पस्तीस वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना सटाणा तालुक्यातील किकवारी येथे घडली़ लक्ष्मण रूपचंद अहिरे (३५ मूळ रा.चौगाव, हल्ली किकवारी, ता.सटाणा) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.

Teenage Suicide At Kikavari | किकवारी येथे युवकाची आत्महत्या

किकवारी येथे युवकाची आत्महत्या

ठळक मुद्देआत्महत्येचे कारण समजू शकले नसून सटाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

नाशिक : विषारी औषध सेवन करून पस्तीस वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना सटाणा तालुक्यातील किकवारी येथे घडली़ लक्ष्मण रूपचंद अहिरे (३५ मूळ रा.चौगाव, हल्ली किकवारी, ता.सटाणा) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अहिरे यांनी मंगळवारी (दि़२०) दुपारच्या सुमारास आपल्या घरी विषारी औषध सेवन केले़ ही बाब लक्षात येताच त्यांना शेजारील दिनेश काकुळते यांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ़राहुल पाटील यांनी तपासून मयत घोषित केले़ दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

Web Title: Teenage Suicide At Kikavari

टॅग्स :Crimeगुन्हा