अझहर शेख, नाशिक : शहर व परिसरात कोरोना आजाराने मृत्यू पावलेले व कोरोना संशयित म्हणून मृत्यू झालेल्या एकूण ७० मृतदेहांचा दफनविधी शहरातील विविध कब्रस्तानांमध्ये करण्यात आला आहे. यासाठी शहरातील काही बोटावर मोजण्याइतके सामाजिक कार्यक र्ते अहोरात्र परिश्रम घेत ‘त्यांचा’ अखेरचा प्रवास सुकर करण्यासाठी झटताना दिसत आहेत.मुस्लीमबहुल भागातील एकूण ४८ व्यक्तींचा कोरोनाने बळी घेतला आहे तर २२ कोरोना संशयित रूग्ण अद्याप दगावले आहेत. या सर्व मृतदेहांचा अखेरचा प्रवास सुकर करण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांचा चमू झटत आहेत. आपल्या आरोग्याची कुठलीही तमा न बाळगता केवळ माणुसकीखातर समाजातील हे सेवाव्रती प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहेत. कुठल्याही प्रकारचा स्वार्थ मनात न ठेवता निरपेक्ष भावनेने केवळ आपल्या समाजातील आपल्या व्यक्तीची अंतीम प्रवासात हेळसांड होऊ नये, म्हणून झटणाऱ्या या सेवकांच्या पाठीशी समाजाने भक्कमपणे उभे राहण्याची गरज आहे; मात्र दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही, याऊलट या सेवकांनाही वेळेप्रसंगी टीकेचे धनी व्हावे लागत असल्याची शोकांतिका आहे.
‘त्यांचा’ अंतीम प्रवास सुकर करण्यासाठी झटतोय सेवाव्रतींचा चमू !
By अझहर शेख | Updated: June 25, 2020 17:51 IST
कुठल्याही प्रकारचा स्वार्थ मनात न ठेवता निरपेक्ष भावनेने केवळ आपल्या समाजातील आपल्या व्यक्तीची अंतीम प्रवासात हेळसांड होऊ नये, म्हणून झटणाऱ्या या सेवकांच्या पाठीशी समाजाने भक्कमपणे उभे राहण्याची गरज
‘त्यांचा’ अंतीम प्रवास सुकर करण्यासाठी झटतोय सेवाव्रतींचा चमू !
ठळक मुद्देएकूण ७० मृतदेहांचा दफनविधीएकूण ४८ व्यक्तींचा कोरोनाने बळी घेतला