ठाणगाव येथील शिक्षकांची वाडी वस्तीर विद्यार्थ्यांना भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 15:28 IST2020-09-24T15:26:36+5:302020-09-24T15:28:15+5:30

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील भोर विद्यालयाने परिसरातील वारेवाडी आडवाडी,गांजावे वस्तीवरील इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.

Teachers from Thangaon visit Wadi Vastir students | ठाणगाव येथील शिक्षकांची वाडी वस्तीर विद्यार्थ्यांना भेट

भोर विद्यालयाच्या वतीने वड्या वस्तीवरील विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन अभ्यास करु न घेताना ए. बी.कचरे, बी. एस.भांगरे, ए. के.चव्हाण यांच्या सह विद्यार्थी व पालक.

ठळक मुद्देआडवाडी परिसरातील पालक वर्गाने कौतुक केले.

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील भोर विद्यालयाने परिसरातील वारेवाडी आडवाडी,गांजावे वस्तीवरील इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.
या गृहभेटीत या जागतिक महामारीत विद्यार्थी अभ्यास करण्यास प्रवृत्त व्हावा यासाठी विद्यार्थ्यांना गृहअभ्यास देण्यात आला. विद्यार्थी देखील आनंदाने भारावून जाऊन अभ्यास करण्यास प्रवृत्त झाले. प्राचार्य व्ही. एस. कवडे यांच्या प्रेरणेने विद्यालयाचे उपशिक्षक बी. एस. भांगरे, ए. बी. कचरे, ए. के. चव्हाण व माणिक खांबाईत यांनी हा उपक्र म राबविला त्याचे आडवाडी परिसरातील पालक वर्गाने कौतुक केले.

विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन अभ्यास करण्यास प्रवृत्त केल्याने विद्यार्थी शिक्षण प्रक्रि येत सक्रि य होतात व दिलेले गृहकार्य आवडीने करतात
- ए. बी. कचरे, प्राचार्य.

Web Title: Teachers from Thangaon visit Wadi Vastir students