शिक्षकांनी तंत्राधिष्टीत कौशल्याचा स्वीकार करावा - डॉ.संजीव सोनवणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 01:33 PM2020-06-22T13:33:40+5:302020-06-22T13:36:10+5:30

नवीन पिढी घडविण्यासाठी शिक्षकांनी तंत्राधिष्टती कौशल्याचा स्विकार करण्याची गरज असल्याचे सावित्रीबाई फुले,पुणे विद्यापीठाच्या आंतर विद्या शाखेचे आधिष्टाता प्रतिपादन डॉ. संजीव सोनवणे यांनी केले

Teachers should accept technical skills - Dr. Sanjeev Sonawane | शिक्षकांनी तंत्राधिष्टीत कौशल्याचा स्वीकार करावा - डॉ.संजीव सोनवणे

शिक्षकांनी तंत्राधिष्टीत कौशल्याचा स्वीकार करावा - डॉ.संजीव सोनवणे

googlenewsNext
ठळक मुद्देशिक्षकांनी अध्यापनाचे नवीन तंत्र आत्मसात करण्याची गरज नवीन पीढी घडविम्यासाठी तंत्राधिष्टीत कौशल्य आवश्यक

नाशिकविद्यार्थ्यांची नवीन पिढी घडविण्यासाठी शिक्षकांनी तंत्राधिष्टती कौशल्याचा स्विकार करण्याची गरज असल्याचे सावित्रीबाई फुले,पुणे विद्यापीठाच्या आंतर विद्या शाखेचे आधिष्टाता प्रतिपादन डॉ. संजीव सोनवणे यांनी केले . अशोका बी एड महाविद्यालयात घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय वेबीनार मध्ये बोलताना ते बोलत होते. डॉ.संजीव सोनवणे म्हणाले,  लॉक डाउन नंतरचा शिक्षक हा तंत्राधिष्टीत आणि कौशल्याधिष्टीत असला पाहिजे.  शैक्षणिक आयोग त्यानी केलेल्या शिफारशी व विद्यार्थी व शिक्षकांचे आयोग या बाबीचा उल्लेख करुन उच्च शिक्षणाच्या नव्या संधी कशा उपलब्ध होतील या बाबत मार्गदर्शन केले. सदर आंतर्राष्ट्रीय वेबीनार मध्ये भारतीय 25 विविध राज्यातून, 650 तर जगातील 20 विविध देशातून 100 शिक्षक, संशोधक व विद्यार्थी  असे एकूण 3500 सहभागीनी  रजिस्ट्रेशन केले होते. शिक्षणाच्या नवी संधीचा शोध घेऊन भविष्यात शिक्षकांनी वाटचाल करावी असे प्रतिपादन आशोका एजुकेशनचे अध्यक्ष अशोकजी कटारिया यांनी केले. द्वितीय सत्रात डॉ.संध्या खेडेकर प्राचार्या गोखले एजुकेशन सोसायटीच्या शिक्षणशास्त्र  महाविद्यालय संगमनेर 21 व्या शतकातील तंत्राधिष्टीत शिक्षक या विषयवार सहभागानी मार्गदर्शन केले. त्यांनी गूगल क्लास ,गूगल डॉक्स, सारख्या विविध ऍपचा समावेश आपल्या व्याख्यानात केला.या 

Web Title: Teachers should accept technical skills - Dr. Sanjeev Sonawane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.