राख वाहतूकदारांवर स्वच्छता कराची आकारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:51 IST2018-11-21T00:50:41+5:302018-11-21T00:51:14+5:30
वीजनिर्मिती कंपनीच्या राख साठवणूक बंधाऱ्यातून रोज हजारो टन राखेची वाहतूक करणाºया वाहनधारकांनी एकलहरे ग्रामपंचायतीस स्वच्छता कर भरून सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच मोहिनी जाधव यांनी केले आहे.

राख वाहतूकदारांवर स्वच्छता कराची आकारणी
एकलहरे : येथील वीजनिर्मिती कंपनीच्या राख साठवणूक बंधाऱ्यातून रोज हजारो टन राखेची वाहतूक करणाºया वाहनधारकांनी एकलहरे ग्रामपंचायतीस स्वच्छता कर भरून सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच मोहिनी जाधव यांनी केले आहे.
एकलहरे ग्रामपंचायत ग्रामसभा दिनांक ११ आॅक्टोबर रोजी केलेल्या ठरावान्वये राखेच्या बंधाºयातील व कंपन्यांच्या गुदामामधून राख वाहतूक करणाºया वाहनांद्वारे मोफत राख वाहून नेली जाते.
राखेची वाहतूक होत असताना मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचीही समस्या निर्माण होते. यावर उपाययोजना करण्यासाठी राख वाहतूक करणाºया वाहनधारकांकडून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांच्या आदेशाने विशेष स्वच्छता मोहिमेअंतर्गत स्वच्छता कर आकारणी ग्रामपंचायतीमार्फत करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार प्रत्येक वाहनचालकाने किमान १०० रुपये प्रतिदिन प्रतिवाहन स्वच्छता कर भरावा. त्यातून राखेमुळे खराब झालेल्या रस्त्याची साफसफाई व पाणी मारणे आदी कामे केली जातील, असेही सरपंच मोहिनी जाधव यांनी स्पष्ट केले.