राजकारण शुद्धीकरणाचे शांतिगिरींचे कार्य मोलाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 00:53 IST2019-08-23T00:52:54+5:302019-08-23T00:53:33+5:30
जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजांचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांचे समाजाला योग्य दिशा देण्याचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. महिला सक्षमीकरणासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. आध्यात्मिक मार्गदर्शनाबरोबरच राजकारणाच्या शुद्धीकरणाचेदेखील कार्य ते करीत आहेत, असे प्रतिपादन छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले.

श्रीश्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी यांच्या प्रेरणेने ओझर आश्रमात होणाऱ्या मातोश्री म्हाळसामाता धर्मसंस्कार सोहळ्याचे ध्वजारोहण करताना खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले. समवेत राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार हेमंत गोडसे, रामानंद महाराज, विष्णू महाराज आदी.
ओझर टाउनशिप : जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजांचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांचे समाजाला योग्य दिशा देण्याचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. महिला सक्षमीकरणासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. आध्यात्मिक मार्गदर्शनाबरोबरच राजकारणाच्या शुद्धीकरणाचेदेखील कार्य ते करीत आहेत, असे प्रतिपादन छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले.
ओझर येथील आश्रमात म्हाळसामाता यांचा पुण्यतिथी सोहळा होणार आहे. या सोहळ्याचे ध्वजारोहण खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री अर्जुन खोतकर उपस्थित होते. व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक करण गायकर, आमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार अपूर्व हिरे, सुनील बागुल, उद्धव निमसे, शिवाजी सहाणे, माजी आमदार मंदाकिनी कदम, पिंपळगावच्या सरपंच अलकाताई बनकर, वैशाली कदम, दामोदर मानकर, सुनील आडके, शिवाजी गांगुर्डे, पंडित भुतेकर व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संभाजीराजे म्हणाले की, शांतिगिरी महाराजांचे कार्य समाजिहताचे असून राजकारणाच्या शुद्धीकरणाचे त्यांचे प्रयत्नदेखील उल्लेखनीय आहेत. राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी म्हाळसामाता यांना अभिवादन केले. तसेच शांतिगिरी महाराज यांच्या कार्याचाही गौरव केला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गरजू महिलांना वस्त्रदान करण्यात आले.
करण गायकर यांनी शांतिगिरी महाराज व संभाजी राजे यांच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. प्रास्ताविक विष्णू महाराज यांनी तर आभार खासदार हेमंत गोडसे यांनी केले.