नायगव्हाणच्या उपसरपंचपदी ताराबाई सदगीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 01:32 IST2021-01-20T21:23:33+5:302021-01-21T01:32:47+5:30

येवला : तालुक्यातील नायगव्हाणच्या उपसरपंचपदी ताराबाई सदगीर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते उपसरपंच श्रावण कांदळकर यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर निवड करण्यासाठी सरपंच हिराबाई ढोणे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. निर्धारित वेळेत एकमेव अर्ज दाखल झाल्याने सदगीर यांची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.

Tarabai Sadgir as Deputy Panch of Naigavhan | नायगव्हाणच्या उपसरपंचपदी ताराबाई सदगीर

नायगव्हाणच्या उपसरपंचपदी ताराबाई सदगीर

प्रशांत पानपाटील यांनी सूचक म्हणून तर मावळते उपसरपंच श्रावण कांदळकर यांनी अनुमोदन दिले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक संजय व्यवहारे यांनी काम बघितले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य काळू मोरे, हिराबाई बारहाते, मेघा देवकर, मंगलाबाई शिंदे आदींसह भाऊसाहेब गाढे, सुनील शिंदे, सचिन भोसले, बाळासाहेब कुलकर्णी, कृष्णा सदगीर, सुभाष पानपाटील, भाऊसाहेब ढोणे, माळी ग्रामसेवक, केदारे ग्रामसेवकासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Tarabai Sadgir as Deputy Panch of Naigavhan