शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

पावसाळ्याच्या तोंडावर जिल्ह्यात टॅंकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 01:35 IST

मागीलवर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने धरणे तृप्त झाली असली तरी मे महिन्यात धरणांमधील साठा कमी झाल्याने जिल्ह्यात पावसाळ्याच्या तोंडावरच टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. सर्वाधिक टॅंकर्स येवला तालुक्यात सुरू असून, ७१ गावे आणि ४५ वाड्यांना ५२ टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा होत आहे. 

नाशिक :   मागीलवर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने धरणे तृप्त झाली असली तरी मे महिन्यात धरणांमधील साठा कमी झाल्याने जिल्ह्यात पावसाळ्याच्या तोंडावरच टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. सर्वाधिक टॅंकर्स येवला तालुक्यात सुरू असून, ७१ गावे आणि ४५ वाड्यांना ५२ टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा होत आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई असली तरी मे महिन्यात टँकर्सची मोठी मागणी  नव्हती. जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असल्याने तसेच यंदा आवर्तनही घटल्यामुळे पाणीटंचाई जाणवणार नसल्याचे वाटत होते. परंतु मे महिना संपता संपता जिल्ह्यात टँकर्स सुरू झाले आहेत. सद्य:स्थितीत ५२ टॅंकरद्वारे ७१ गावे व ४५ वाड्यांना टॅंकर्सने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

यापूर्वी येवला तालुक्यात सर्वप्रथम टँकर सुरू करण्यात आला होता. आता येथील टॅंकर्सची संख्या सर्वाधिक १८ इतकी आहे. अशातच पावसाचे उशिरा आगमन झाले तर जिल्ह्यातील टॅंकर्सची संख्या वाढण्याचीदेखील शक्यता आहे. उन्हामुळे नदी व नाले आटले असून, विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे  दहा तालुक्यांमधून टॅंकर्सची मागणी झाली. त्यानुसार त्यांना टॅंकर्स पुरविण्यात आले असून, ५२ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. शासकीय व ४५ खासगी टॅंकरने गाव, वाड्या व वस्तींवर पाणी पोहोचवले जात आहे.  मागील वर्षी  टॅंकर्सची संख्या पन्नासच्या जवळपास होती.    रोज टॅंकर्सच्या १२२ फेर्‍या होत असल्याने गाव वाड्यांमधील  ९६ हजार ग्रामस्थांची तहान भागवली जात आहे. जिल्ह्यातील बागलाण, चांदवड, देवळा, इगतपुरी, मालेगाव, नांदगाव, पेठ, सुरगाणा, त्र्यंबक, येवला या तालुक्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत आहे. 

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदWaterपाणी