शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

जिल्ह्यात टॅँकरचे त्रिशतक पार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 1:29 AM

उन्हाचा वाढता तडाखा व पाण्याच्या मागणीत झालेली वाढ पाहता, जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या एक हजाराहून अधिक पोहोचली असून, त्यासाठी सव्वातीनशे टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

नाशिक : उन्हाचा वाढता तडाखा व पाण्याच्या मागणीत झालेली वाढ पाहता, जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या एक हजाराहून अधिक पोहोचली असून, त्यासाठी सव्वातीनशे टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या काही वर्षांनंतर पहिल्यांदाच जिल्ह्णात विक्रमी संख्येने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली असून, मान्सूनचे यंदा उशिराने आगमन होणार असल्याने ही संख्या चारशेच्या आसपास पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.जिल्ह्यात मे महिन्याच्या मध्यावर टंचाईच्या झळा अधिकच तीव्र होऊ लागल्या आहेत. धरण प्रकल्पांतही अवघा १० टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने नागरिकांना पिण्यासाठी टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे. डिसेंबर अखेरपासूनच जिल्ह्णात टँकर सुरू करण्यात आले. टंचाई परिस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनीही संपूर्ण राज्याचा आढावा घेत दुष्काळी उपाययोजना राबविताना मागणी आल्यास तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. दुष्काळी उपाययोजना राबविण्यासाठी आचारसंहिता शिथिल करण्यात आली असली तरी, जिल्ह्णात एकही पाणीपुरवठा योजना सुरू होऊ शकलेली नाही. त्यामुळे सध्या टंचाई निवारणासाठीही प्रशासनाने टँकरवरच भर दिल्याचे दिसून येते. टँकर मंजुरीचे अधिकार प्रांतस्तरावर देण्यात आल्याने टँकरची संख्याही झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येते. जिल्ह्णातील २१० गावे, ८५९ वाड्या अशा १ हजार ६९ गावांना ३२५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात २२ शासकीय आणि ३०३ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक ६९, सिन्नर तालुक्यात ६१ टँकर सुरू आहेत. टँकरच्या ८३५फेऱ्या मंजूर असून, प्रत्यक्षात ७५७ फेºया सुरू आहेत. आठवडाभरापूर्वी २९२ टँकर सुरू होते. त्यात वाढ होत आता संख्या सव्वातीनशेच्या घरात पोहोचली आहे.तालुकानिहाय टँकरची संख्याबागलाण ३८, चांदवड १४, दिंडोरी १, देवळा १५, इगतपुरी १०, मालेगाव ४९, नांदगाव ६९, सुरगाणा ७, पेठ ३, सिन्नर ६१, त्र्यंबक ७, येवला ५१ इतके टॅँकर सुरू आहेत, तर ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने २१० खासगी विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. त्यात बागलाण २०, दिंडोरी ११, देवळा २३, इगतपुरी १०, कळवण ३७, मालेगाव ४५, नांदगाव १९, निफाड २, पेठ २६, सुरगाणा ५, सिन्नर ३, येवला ९ या विहिरींचा समावेश आहे.

टॅग्स :droughtदुष्काळwater shortageपाणीटंचाई