आडगावमध्ये टांगा शर्यत भोवली; संयोजकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 14:14 IST2018-02-08T14:11:16+5:302018-02-08T14:14:57+5:30
प्राण्यांना शर्यतीसाठी जुंपत त्यांच्या शरीरावर चाबकाचे आसूड ओढत छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस अधिक तपास करीत आहे.

आडगावमध्ये टांगा शर्यत भोवली; संयोजकावर गुन्हा दाखल
नाशिक : प्राण्यांच्या टांगा शर्यतीवर बंदी असतानाही आडगाव शिवारात बैल व घोड्याला टांग्याला जुंपून त्यांची शर्यत लावल्याप्रकरणी आडगाव पोलिसांनी संशयिताविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. आडगाव शिवारातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेला लागून असलेल्या भुखंडावर टांगा शर्यत भरविणारे पंच व संयोजक सागर माळोदेविरुध्द यशवंत मोहन गांगुर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राण्यांना शर्यतीसाठी जुंपत त्यांच्या शरीरावर चाबकाचे आसूड ओढत छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस अधिक तपास करीत आहे.
---
अंबडच्या कारगील चौकात राहत्या घरात तरुणीची आत्महत्त्या
नाशिक : अंबड परिसरातील कारगील चौकामध्ये राहणा-या जयश्री रुपसिंग ठाकरे (२६) या युवतीने राहत्या घरात पंख्याच्या आधारे ओढणीने गळफास लावून आत्महत्त्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास जयश्रीने गळफास घेतल्याचे पोलीस ठाण्यात करण्यात आलेल्या अकस्मात मृत्यूच्या नोंदीत म्हटले आहे. आत्महत्त्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.
--
शस्त्रबंदी आदेश : कोयता घेऊन कॉलेजरोडवर फिरणारे तीघे ताब्यात
नाशिक : शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करीत कॉलेजरोड परिसरात धारधार कोयता घेऊन वावरणा-या तीघांना पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली आहे. संशयित किरण दत्तात्रय चव्हाण(१९) व त्याचे तीन साथीदार कोयता घेऊन कॉलेजरोड परिसरातील एका हॉटेलमागे फिरत होते. दरम्यान, पोलिसांना सदर बाब लक्षात येताच्या त्यांनी कोयता जप्त करत तीघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुध्द गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवळाली कॅम्पच्या राईसमिल मधून ८० हजार लंपास
नाशिक : देवळाली कॅम्प परिसरातील भगूर रस्त्यावर असलेल्या सप्तश्रृंगी राईस मिलचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत ८० हजार रुपयांची रोकड लंपा केल्याची घटना उघडकीस आली आहे.
दुकानमालक देवेंद्र प्रकाश पवार (४०) यांनी दोघा अज्ञात चोरट्यांविरुध्द देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास दुकान फोडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.