शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
2
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
3
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
6
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
7
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
8
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
9
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
10
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
11
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
12
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
13
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
14
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
20
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
Daily Top 2Weekly Top 5

तळीरामांची दिवाळीपूर्वीच ‘दिवाळी’

By admin | Updated: October 22, 2016 22:42 IST

पांढुर्ली : सिन्नर-घोटी मार्गावर मद्याचा ट्रक उलटला

पांढुर्ली : सिन्नर - घोटी मार्गावर मुंबईकडे मद्याचे बॉक्स घेऊन जाणारा ट्रक उलटल्याची घटना शुक्रवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली. मद्याचे बॉक्स रस्त्यावर पडलेले असल्याची वार्ता मध्यरात्री अनेकांच्या कर्णोपकर्णी गेल्यानंतर अनेकांनी मद्याचे बॉक्स व बाटल्या पळवत दिवाळीपूर्वीच ‘दिवाळी’ साजरी केल्याची चर्चा आहे. वैजापूर तालुक्यातील लोणी येथील पोपट बागुल हा चालक त्याच्या ताब्यातील ट्रकमध्ये (क्र. एमएच १५ डीके २९७७) मद्याचे ७७५ बॉक्स घेऊन मुंबईकडे जात होता. आंध्र प्रदेशातील धर्माबाद येथील पोहेनर कंपनीतून मद्याचे बॉक्स घेऊन जालना, औरंगाबादमार्गे सिन्नरहून मुंबईकडे जात असताना पांढुर्लीजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने हूल दिली. यामुळे चालकाने ट्रक डाव्या बाजूला घेतला मात्र नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. त्यामुळे मद्याचे बॉक्स रस्त्यावर  पसरले. त्यात अनेक बाटल्या  फुटल्या.  रात्री मद्याचे बाटल्या घेऊन जाणारा ट्रक रस्त्याच्या कडेला उलटल्याचे अनेकांना समजल्यानंतर तळीरामांनी घटनास्थळी धाव घेतल्याचे समजते. घटनास्थळी अंधार असल्याने त्याचा फायदा घेत अनेकांनी मद्याचे बॉक्स व बाटल्या पळवल्या. घटनेची माहिती पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या तळीरामांना रोखल्याचे समजते. त्यानंतर शनिवारी दुपारपर्यंत पोलीस ट्रकजवळ बसून होते. दिवाळीपूर्वीच तळीरामांची दिवाळी झाल्याची परिसरात जोरदार चर्चा आहे. (वार्ताहर)